Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube

cs3dmb

04
Feb

B05- ब्लेंडरची ओळख

3D ग्राफिक्स मधल्या सगळ्या सॉफ्टवेअर्समधे अनेक मुलभूत संकल्पनांत साम्य आढळतं. उदाहरणार्थ कोऑर्डिनेट सिस्टम. त्यासाठी ‘कार्टेशिअन’ आलेख पद्धतीचा सर्वात जास्त वापर केला जातो. Q: हो मागच्या …

Read More →
28
Jan

B04- कथा मांडणी

ACT 1 हा story establishment चा असतो. म्हणजे प्रेक्षकांना आपल्या गोष्टीतल्या कॅरेक्टर्सची आणि एकंदर कथेची ओळख करून देण्यासाठी तो वापरतात. आपल्या स्टोरीतही आपल्याला टिंगू आणि त्याच्या आजूबाजूच्या वस्तू प्रेक्षकांसमोर हळूहळू मांडता येतील. सुरवातीला कदाचित आपण एखादं गजराचं घड्याळ वाजतंय असं दाखवू शकतो. तो आपल्या गोष्टीचा Trigger event होईल.

Read More →
21
Jan

B03- सॉफ्टवेअर्स बद्दल

आपण ब्लेंडर निवडण्याचं सर्वात मोठं कारण असं की ते फ्री आहे. तुम्ही सगळे जण ते अगदी अधिकृतपणे वापरू शकाल. ते इन्स्टॉल करायलाही अगदी छोटं आणि सोपं आहे. शिवाय नुसती किंमत हा मुद्दा नाहीये, तर गुणवत्तेच्या बाबतीतही ब्लेंडर खुपच उत्तम कामगिरी करतं. जगभरात अनेक जण, अनेक Animation स्टुडीओज् आणि फिल्म मेकर्स मोठ्याप्रमाणात ब्लेंडर वापरतात. आमच्या अद्वैत स्टुडीओज् या कंपनीतही, गेली अनेक वर्षे आम्ही आमची सगळी कमर्शियल कामं, ब्लेंडरवरंच करत आलो आहोत. त्यामुळे ते इतक्या वर्षात एकदम ‘प्रुव्हन’ झालं आहे.

Read More →
14
Jan

B02- पूर्वतयारी

त्या निमित्तानी आपल्याला 3DCG अर्थातच 3D कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या विविध अंगांची प्रत्यक्ष ओळख होईल. हे सर्व करायला आपल्याला निश्चितच काही सोफ्टवेअरची आवश्यकता भासणार आहे. आपलं काम सहज व्हावं म्हणून आपण काही फ्री सोफ्टवेअर्स वापरणार आहोत. मी तुम्हाला गरजेप्रमाणे त्याच्या डाऊनलोड लिंक्स देणार आहे. मात्र त्याआधी तुमची काय पूर्वतयारी असायला हवी हे आता सांगत आहे.

Read More →
07
Jan

B01- आपल्या अॅनिमेशन फिल्मची कथा

Vol 2, part 1- आपली गोष्ट अशी आहे की एकदा हा टिंगू झोपेतून उठल्यावर त्याला रुबीक्स क्यूब दिसतो. त्यामुळे टिंगू त्याचे सगळे रंग बरोबर लावण्याचा प्रयत्न करायला लागतो. पण बऱ्याच वेळा ट्राय करूनही त्याला ते काही जमतच नाही. शेवटी चिडून तो क्यूब डोक्यानी उडवून लावतो. त्यामुळे क्यूब मागच्या भिंतीवर आपटून पडतो. तर काय आश्चर्य त्याचे सगळे रंग एकदम परफेक्ट लागलेले असतात. ते बघून आधी टिंगू दचकतो पण नंतर खात्री करून घेण्यासाठी पुन्हा तसं करून बघतो. तर सगळे रंग मिक्स होतात. आणि पुन्हा फेकल्यावर रंग परत बरोबर लागतात. टिंगूला एकदम मजा वाटते आणि तो आनंदानी उड्या मारतो. आणि आपली फिल्म इथेच संपते.

Read More →