Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
29
Oct

A01- प्रस्तावना

श्री गणेशाय नमः।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।।

नमस्कार, ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि 3D अॅनिमेशन’ विश्वाच्या या सफरीमधे, मी महेश देशपांडे आपलं स्वागत करतो. माझ्या ज्या गुरुंमुळे मला animation क्षेत्राची ओळख झाली आणि Walt Disney, Richard Williams, John Lasseter सारख्या ज्या अनेक थोर कलाकारांच्या कार्यातून सतत प्रेरणा मिळाली, त्या सर्वांना प्रथम वंदन करतो. अत्यंत तळमळीने ही मंडळी कला, तंत्रज्ञान आणि ज्ञानप्रसार करत आली आहेत, त्यालाही वंदन करतो. आणि ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि 3D अॅनिमेशन’ क्षेत्राबद्दल सहज, सोपी पण सखोल माहिती उपलब्ध करण्याचा हा माझा प्रकल्प, खारीचा वाटा म्हणून, त्या महान कलाकारांच्या पायी अर्पण करतो.

आपल्या मुख्य विषयाला सुरवात करण्यापूर्वी, आधी थोडी पार्श्वभूमी मांडतो. काही वर्षांपूर्वी म्हणजे २००३ साली, याच ‘3D अॅनिमेशन’ विषयावर माझा एक लेख सकाळ पेपरमधे प्रसिद्ध झाला होता.

CS3DM-ARTICLE-01-2003-web

त्या वेळी या विषयावर फारसे लेख येत नसंत. साहजिकच, या माझ्या लेखनाला वाचकांकडून भरपूर चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर, २००४ साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या लेखालाही तसाच भरपूर प्रतिसाद मिळाला होता. अनेक जणांकडून या विषयावर अधिक माहिती मिळावी अशी मागणी होत होती. या अनुभवावरून प्रेरणा घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या पर्यंत यायचं ठरवलंय. कॉम्प्युटर ग्राफिक्स या क्षेत्राबद्दल आकर्षण असणाऱ्यांना या शाखेची अधिक माहिती मिळावी, हे या मालिकेचं मुख्य प्रयोजन आहे.

खरंतर अॅनिमेशन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स हे शब्द आपल्याला काही नविन राहिलेले नाहीत. अगदी ‘मिकी माउस’ पासून ‘श्रेक’ पर्यंत आणि ‘स्टार वॉर्स’ पासून ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ पर्यंत आपण सतत ते ऐकत आलोय. साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात अॅनिमेशन आणि ग्राफिक्स बद्दल खूप attraction असतं. आणि आपल्यापैकी अनेक जणांना आपणही अॅनिमेटर व्हावं किंवा आपणही एखादी अॅनिमेशन फिल्म तयार करावी असं वाटतंच. म्हणूनच ही सिरीज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय.CS3DM-Kutuhal-to-Career-web

या क्षेत्राकडे कुतूहल म्हणून बघणाऱ्यांपासून, थेट करिअर म्हणून बघणाऱ्या तुम्हा सगळ्यांना या सिरीजचा नक्कीच उपयोग होईल. या सिरीजच्या अनुषंगाने आपण कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या अनेक अंगांची अगदी विस्तृत माहिती घेणार आहोत. 3D ग्राफिक्स मधल्या मुलभूत संकल्पना आणि गाभ्याची ओळख करून घेणार आहोत. अॅनिमेशन फिल्म कशी बनवतात?, कॉम्प्युटर ग्राफिक्सचे काय काय उपयोग आहेत?, या आणि अशा अनेक मुद्यांवर आपण धम्माल गप्पा मारणार आहोत. आणि एक छोटीशी अॅनिमेशन फिल्म बनवणार आहोत.

हो! हो! आपण चक्क एक अॅनिमेशन फिल्मसुद्धा बनवणार आहोत. आणि तुम्ही त्याचे अॅनिमेटर असाल! काय उडालातना खुर्चीवरून? पण इतक्यात घाई करू नका, आपल्याला अजून खूप गोष्टींची माहिती घ्यायचीये आणि खूप खूप गोष्टी शिकायच्यायत. मात्र यासाठी मला तुमचीही तितकीच साथ लागेल. काळजी करू नका! आपण हे भाग शक्य तितक्या सोप्या पद्धतीने पुढे नेऊ.

आणि हो, या सिरीजच्या जोडीला मी तुम्हाला अजूनही काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहे. या सर्व गोष्टी तुम्ही इंटरनेटवरून सहज डाऊनलोड करू शकाल. त्याच्या लिंक्स मी वेळोवेळी देत जाईनच.
काय मग? आवडेल ना? अॅनिमेशनचा हा प्रवास करायला?

चला तर मग! 3D अॅनिमेशन शिकूया! भेटूया पुढच्या भागात…

< back

Index

next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

4 comments

  1. Great Start…

    All the best to you Mahesh and your students..!

  2. Thanks sir for your information

Pingbacks

  1. A02- या सिरीजचा आराखडा | Advaita Studios
  2. B21- व्हॉल्यूम 2 पर्यंतचा मागोवा | Advaita Studios