Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
19
Nov

A04- कॉम्प्यूटर अॅनिमेशन

अॅनिमेशन हे लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणारं सर्वात प्रभावी माध्यम ठरलं आहे. आणि त्यामागे computer चा वापर आता फक्त करमणुकीसाठीच नाही तर मेडिकल, इंजिनिअरिंग, अॅड्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे. आपण मागच्या भागात ‘frame by frame’ अॅनिमेशन बघितलं. आठवतंय?

Q: हो. त्याच्यासाठी सलग चित्रांची मालिका केली जाते.

हो, तसंच जर आपण माती किंवा क्ले वापरून आकार तयार केले आणि त्यांना हलवून त्यांचे सलग फोटो काढले तरी मस्त अॅनिमेशन तयार होतं.

StopMotion-102e-200hQ: मला वाटतं, बहूतेक यालाच ‘Stop motion animation’ म्हणतात, हो ना?

बरोबर, तेही एकप्रकारचं अॅनिमेशनच आहे. हालत्या बाहुल्या वापरून केलेल्या अॅनिमेशनला पपेट (Puppet) अॅनिमेशन म्हणतात. अशाप्रकारे वेगवेगळी मध्यमं वापरून अॅनिमेशन करता येतं आणि मुख्य म्हणजे आपल्या मनातली संकल्पना दुसऱ्यापर्यंत पोचवता येते. शेवटी त्यातली कला आणि कारण महत्वाचं, मग त्याचं मध्यम कोणताही का असेना. चित्रं काढण्यासाठी पेन्सिल सारखी साधनं वापरली जातात. रंग, ब्रश इ. वापरून ती छान रंगवता येतात. कागद, पुठ्ठा यांना घड्या घालून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. एवढंच काय, अगदी मातीपासूनही सुंदर कलाकृती निर्माण केल्या जातात. या अशा कलांप्रमाणेच computer animation ही पण एक कलाच आहे.

Q: या कॉम्प्यूटर अॅनिमेशन बद्दल आणखी सांगू शकाल का?

कॉम्प्यूटर हे पेन्सिल किंवा ब्रश सारखं एक साधन आहे. Computer म्हणजे जणू एक प्रकारची पेन्सिलंच आहे असं समजा. तिचा वापर करायला शिकल्यामुळे आपणही अनेक सुंदर कलाकृती घडवू शकतो, अनेक प्रकारची अॅनिमेशन करू शकतो. अॅनिमेशन या कलेला आपण जेंव्हा कॉम्प्यूटरची जोड देतो तेंव्हा आणखीनच मजा सुरु होते. हल्ली कॉम्प्यूटर अॅनिमेशन करताना साधारणपणे फ्रेम बाय फ्रेम पद्धत वापरत नाहीत. कॉम्प्यूटरमधली अॅनिमेशन करण्याची सर्वात मुख्य पद्धत म्हणजे ‘key frame’ पद्धत. आपण आधी बघितलेल्या बॉलच्या animation सारखं या टेक्निक मध्ये फक्त मुख्य चित्रं किंवा Key poses (की पोझेस) तयार केली जातात. या चित्रातील हालचालीच्या फरकावरून आणि वेळेवरून, कॉम्प्यूटर मधली उरलेली चित्रं तयार करतो. यामुळे आपला, सगळी चित्रं काढत बसण्याचा वेळ वाचतो.

Ball-3-keyframed

Q: आपणही असंच कॉम्प्यूटरवर animation करणार आहोत?

म्हणजे काय, यालाच तर ‘computer animation’ म्हणतात. तुम्हाला भरपूर animation करायला मिळेल. आपण आपली फिल्मही याच टेक्निकचा वापर करून बनवणार आहोत. पुढे आपण यावर सविस्तर बोलूच. Computer animation मध्ये, या टेक्निकशिवाय, प्रोसिजरल अॅनिमेशन आणि सिम्युलेशन (Procedural animation and simulation) अशा काही पद्धती येतात. या प्रकारात ‘फ्रेम बाय फ्रेम’ किंवा ‘की-फ्रेम’ च्याही पुढे जाउन विशिष्ठ प्रोग्रॅम किंवा फॉर्म्युलाच्या आधारे चित्रातील वस्तू आपोआप हालचाल करू शकतात. अशाप्रकारे अॅनिमेशन करण्यासाठी कॉम्प्युटर आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी आणि महत्वाची मदत करतो. जणू जादूची कांडीच.

पण कॉम्प्युटरमुळे गोष्टी कितीही आपोआप घडत असल्या तरी, शेवटी ते एक ‘साधन’ आहे. आपल्याला कला जोपासावीच लागते. मेहनत करावीच लागते आणि रियाजही करावाच लागतो. एखाद-दुसरं बटन दाबून सगळं काम आपोआप होईल, असं वाटणाऱ्या लोकांसाठीचं मुळी हे क्षेत्रंच नाहीये.

अॅनिमेशन उत्तम होण्यासाठी आपल्या प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आपल्याला अपेक्षित असलेला आभास निर्माण करता यायला हवा. त्यांना visualise होण्यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करू शकतो. आजी जेंव्हा लहान मुलाला चिऊ-काऊची गोष्ट सांगते तेंव्हा, प्रत्यक्ष चिऊ डोळ्यासमोर नसतानाही ती मुलांच्या मनात समोर येते, दाणे खाते. हे सुद्धा एक प्रकारचं अॅनिमेशनंच आहे. आपल्या संस्कृतीमध्ये तर विविध प्रकारे आपल्याला अशी अॅनिमेशनची किंवा व्हिज्युअलाइझेशनची उदाहरणं पहायला मिळतात. पहाटे जेंव्हा वासुदेव दारासमोर गाणं म्हणतो, एखादे कीर्तनकार जेंव्हा प्रवचन देतात तेंव्हा त्यांच्या अभंगातली घटना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर येते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जेंव्हा शिवरायांच्या गोष्टी सांगतात तेंव्हा आपल्या डोळ्यासमोर साक्षात शिवाजी महाराज अवतरतात. त्यांचे मावळे दिसतात, रायगड दिसतो. आपण जणू खरंच तिथे उभे आहोत असा भास होतो. बघा! आत्ता सुद्धा स्क्रीनवर काही नसतानाही तुमच्या डोळ्यासमोर बरंच काही येतंय. हो ना? कॉम्प्यूटर अॅनिमेशनचा वापर करून असंच छान प्रकारे व्हिज्युअलाइझेशन करता येतं.

Q: आता मला एकंदर या CG चं बरंच स्पष्ट चित्रं दिसतंय. पण मग 3D animation म्हणजे वेगळं काय असतं?

आपण जेंव्हा कागदावर चित्रं काढतो तेंव्हा त्याला लांबी आणि रुंदी (Length and width) असते. तेंव्हा आपण चित्राच्या जाडीचा (Thickness) विचार करत नाही. आपण फक्त लांबी आणि रुंदी अशा दोनच dimension (मिती) चा विचार करतो. म्हणून अशा प्रकाराला two dimensional किंवा 2D म्हणतात. पण जेंव्हा आपण मातीपासून, क्ले पासून वस्तू बनवतो तेंव्हा आपण ती वस्तू सर्व बाजूंनी पाहू शकतो. उदा. समोरून, वरून, बाजूने इ. म्हणजेच आपण त्याच्या लांबी, रुंदी आणि उंची (किंवा जाडी) अशा तीनही डायमेन्शनचा विचार करतो. यालाच 3D म्हणतात.

Computer animation करणाऱ्या software मधेही साधारण असेच दोन मुख्य भाग पडतात. 2D animation software आणि 3D animation software. 2D software मध्ये आपण अगदी कागदावर काढल्यासारखं चित्र काढू शकतो. फ्रेम बाय फ्रेम सलग अनेक चित्रं काढू शकतो. आणि मदतीला computer असतोच. 3D animation software मध्ये तर आपण प्रत्यक्ष 3D वस्तू तयार करू शकतो. अगदी कागद किंवा क्ले सारखी, सगळीकडून वस्तू बघू शकतो. शिवाय मगाशी बघितल्याप्रमाणे key-frame, procedural animation किंवा simulation सुद्धा करू शकतो. अशा अनेक पद्धती 3D softwares मध्ये खूप विकसित झाल्या आहेत.

‘चला शिकूया 3D animation’, ही आपली सिरीज सुद्धा खास याच विषयावर आधारित आहे. आणि आपण आपली animated short film सुद्धा 3D animation technique वापरूनच करणार आहोत. तेंव्हा आणखी धम्माल करण्यासाठी पुढचे भाग नक्की बघा. आणि हो, मागचे भाग तुम्हाला कसे वाटले, ते मला नक्की कळवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर त्याही मला आवर्जून सांगा. त्यासाठी या प्रत्येक लेखाच्या शेवटी खाली ‘Leave a Reply’ सेक्शन आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला खूपच महत्वाच्या आहेत.

तर मग भेटूया पुढच्या भागात.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

10 comments

 1. It’s really interesting articles. I will like to learn all these concepts.
  I am feeling actually like that I am sitting in class.
  Nice explanation sir.
  Thanks.

 2. Thanks for your appreciation. There will be a new article on each Wednesday, so stay connected. You may want to like us on Facebook.
  Here is the link: https://www.facebook.com/AdvaitaStudios

 3. Harshada Deshpande March 30, 2015 at 8:35 pm

  it’s really interesting articles. I will love to learn all technics & concepts.
  I am a graphic designer and Applied Artist.
  but my dream is to become a great animator.
  your articles help me out for my future dream
  Really nice explanation sir.
  could you please help me for my career?
  please give me your address and phone number.

  Regards,
  Harshada Deshpande.

 4. Thanks for your interest in graphics and animation!
  I will send my contact no. Till then, I highly recommend you to read all the articles!
  Thanks,
  Mahesh Deshpande.

 5. Nitikesh Arun Bhise August 2, 2015 at 4:48 am

  There is only word 2 say sir totally guiade.

 6. I,m intresting in 3d animation. Like your explains sir
  Thanks, sir

 7. Glad to here that you liked it 😀

 8. Thanks,

  Please your contac no.
  Your address please sir .

Pingbacks

 1. अॅनिमेशन म्हणजे नक्की काय? | Advaita Studios
 2. कॉम्प्युटर ग्राफिक्स (CG)- व्याप्ती व आवाका | Advaita Studios