Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
26
Nov

A05- कॉम्प्युटर ग्राफिक्स (CG)- व्याप्ती व आवाका

Q: कॉम्प्युटर ग्राफिक्स कुठे कुठे वापरलं जातं?

हो, आपण कॉम्प्युटर ग्राफिक्सची एकंदर व्याप्ती आणि आवाका पाहू. 3D CG चा वापर, कोणकोणत्या ठिकाणी आणि कसा केला जातो हे पाहू.

१. फिल्म्, TV ads इ:

 

 

फिल्म किंवा चित्रपट क्षेत्र ही कॉम्प्युटर ग्राफिक्सची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणता येईल. हॉलीवूड पाठोपाठ आता बॉलीवूड मधेही कॉम्प्युटर अॅनिमेशनचा सर्रास वापर केला जातो. त्यामध्ये मुख्यत्वे स्पेशल इफेक्ट्स,  व्हर्च्यूअल कॅरॅक्टरस्, डिजिटल सेट्स इ. साठी मोठ्या प्रमाणात 3D ग्राफिक्स वापरले जाते. TV चॅनल वर अनेक जाहिरातींसाठी अॅनिमेशन टेक्निक वापरले जाते. या क्षेत्राविषयी आपण कितीही बोललो तरी कमीच. आणि मी आधी सांगितल्या प्रमाणे आपणही एक छोटीशी फिल्म बनवणारच आहोत.

२. 3D गेम्स:

 

 

सध्या अनेक गेम्स नव्याने 3D रुपात येत आहेत. या प्रकाराला इंटरॅक्टिव्ह 3D किंवा रिअल टाईम 3D असेही म्हणतात. एखादी फिल्म् आणि इंटरॅक्टिव्ह 3D यातील प्रमुख फरक म्हणजे फिल्म् मधे आपण थेट सहभाग घेऊ शकत नाही, परंतु तेच समजा एखादा इंटरॅक्टिव्ह 3D शो असेल तर तुम्ही त्यात थेट सहभागी होऊ शकता. या प्रकारात आपलं इंटरॅक्शन थेट असतं.

Q: हो, या दोन्हीही फिल्ड्स बद्दल भरपूर ऐकायला मिळतं.

कंप्युटर ग्राफिक्सचा वापर याशिवाय आणखी अनेक दिशांना केला जातोय आणि तो वाढतोयही. त्यातल्याच काही मोजक्या बघूया-

३. ट्रेनिंग:

 

 

अनेक गुंतागुंतीचे अभ्यासक्रम किंवा समजायला क्लिष्ट विषय दृश्य माध्यमातून खूप प्रभावी पद्धतीने समजून सांगितले जाऊ शकतात. शिक्षक जसे तक्ते, नकाशे, स्लाईडशो किंवा स्लाईड प्रोजेक्टर वापरतात, त्याच प्रकारे ३डी अॅनिमेशनचा वापर करून अनेक अवघड गोष्टी सहज- सोप्या आणि दृश्य पद्धतीने सांगता येतात. अगदी भाषा, गणित, भूगोल, रसायनशास्त्र इत्यादी शालेय विषयांपासून ते थेट खगोलशास्त्र, इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, रोबोटिक्स इथपर्यंत कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक साहित्य प्रभावीपणे बनवता येऊ शकते. काही वेळा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवणे खूप अवघड किंवा कधीकधी अशक्य असते. उदाहरणार्थ एखाद्या गाडीचे इंजिन कसे चालते, त्याच्या आत नक्की कायकाय होते, हे प्रत्यक्ष दाखवणे सध्यातरी शक्य नाहीये. (कारण अजून पारदर्शक इंजिनचा शोध लागायचाय!)

इंजिनिअरिंगचेच दुसरे एखादे उदाहरण घ्यायचे झाले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना Universal coupling, Differential Gears अशी काही क्लिष्ट मेकॅनिझम्स कशी काम करतात हे डोळ्यासमोर येत नाही. याशिवाय जीवशास्त्र, वैद्यक-शास्त्र अशा बाबतीतही खूपदा विद्यार्थ्यांना नीट व्हिजुअलाईज न झाल्यामुळे विषय समजण्यास कठीण होतो. पुस्तकांतील आकृत्या बघून मोशन किंवा हालचाल समजावणे कठीण असते. अशावेळी 3D ग्राफिक्सच्या माध्यमातून तोच विषय audio-visual पद्धतीने आणि मुख्य म्हणजे छान, सहज, सोपा आणि स्पष्टपणे मांडता येतो. हल्ली बऱ्याच संस्था, कंपन्या आपल्या प्रोडक्टची माहिती, त्यांचे User’s Guide, अशा 3D ग्राफिक्स माध्यमातून दाखवतात.

४.केस स्टडी:

 

 

हल्ली प्रामुख्याने न्यूज चॅनलस् एखादी घटना प्रेक्षकांना नीट समजून सांगता यावी यासाठी 3D ग्राफिक्स वापरतात. हवामानाचा अंदाज सांगताना नकाशे दाखवणे, रस्त्यावर घडलेला एखादा दुर्दैवी अपघात कसा झाला असेल याचा अंदाज सांगणे, किंवा त्याचा अभ्यास करणे, रस्त्यावरील गर्दी किंवा ट्रॅफिक कशी नियंत्रित करता येऊ शकेल याचे व्हिजुअल पद्धतीने विश्लेषण करणे ई. अनेक गोष्टींसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. एखादे मोठे पूल किंवा कारखान्याचे बांधकाम प्रत्यक्ष करण्याच्या आधी, विविध अंगांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी ३डी ग्राफिक्स वापरले जाते.

Q: हो, हे आपण TV वर नेहमी बघत असतो, पण त्याच्या मागची टेक्नोलॉजी माहीत नसते.

५. आर्किटेक्चरल आणि इंजिनिअरिंग प्रेसेंटेशन:

 

 

नव्याने उभ्या राहिलेल्या या क्षेत्राकडे हल्ली खूप जण करिअर म्हणून पाहतात. Architects किंवा Engineers यांनी डिझाईन केलेल्या रचना प्रत्यक्षात येण्याआधी त्याचे विश्लेषण व अभ्यास करणे, यासाठी ३डी ग्राफिक्स मोठ्या प्रमाणात वापरले जाते. इमारतींची संकल्पना मांडण्यासाठी, त्याची जाहिरात करण्यासाठी त्याचप्रमाणे त्याचा स्थापत्यशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी ग्राफिक्स वापरलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या घरातील खोलीत बाहेरील उजेड किती व कसा आत येऊ शकेल, दिव्याची जागा व संख्या ठरवणे, इत्यादी सारखा अभ्यास करता येतो. एखाद्या कारखान्याचे कामकाज म्हणजे Factory operation कसे चालेल, आतील यंत्रणा कशी कार्य करेल, आतील मालाची देवाणघेवाण किंवा Material Handling कसं होईल, याचा अभ्यास करण्यासाठी ३डी ग्राफिक्स वापरलं जातं.

६. सिम्युलेशन:

 

 

अॅनिमेशनच्या थोडी पुढची पायरी म्हणजे सिम्युलेशन. सिम्युलेशनचा वापर मुख्यत्वे तांत्रिक किंवा वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी केला जातो. सिम्युलेशनचे दोन ढोबळ प्रकार आपण पाडू शकतो. ते म्हणजे काइनॅटिक आणि काइनॅमॅटिक. हल्ली सर्व अॅनिमेशन सॉफ्टवेअर्समधे ही दोन्ही प्रकारची सिम्युलेशन समाविष्ट झाली आहेत. काइनॅटिक प्रकारात पदार्थाच्या वस्तुमान, आकारमान, घनता, गुरुत्वमध्य इत्यादी पासून अगदी पदार्थाच्या सूक्ष्म कणांच्या रचनेसारख्या, अनेक बाबींचा विचार करून त्या पदार्थाचे वैज्ञानिक आणि अभियांत्रिक पृथक्करण केले जाते. काइनॅमॅटिक प्रकारात मात्र वजन, वस्तुमान अशा काही गोष्टी सोडून इतर बाबीचा वापर हालचालींचा Analysis करण्यासाठी वापरतात. क्लिष्ट वैज्ञानिक उपयोगासाठी अॅनिमेशन सॉफ्टवेअर्स न वापरता CAD/CAM गटातली सॉफ्टवेअर्स वापरली जातात. बऱ्याच वेळा फक्त दृश्य विश्लेषण पुरेसे असते, अशा वेळी अॅनिमेशन सॉफ्टवेअर्स प्रार्थमिक कामासाठी वापरली जातात. याशिवाय एखाद्या यंत्रणेच्या हालचालींच्या वेळेचा अभ्यास, म्हणजे Time Analysis, व्हिजुअल पद्धतीने करण्यासाठीही ३डी ग्राफिक्स वापरले जाते.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

8 comments

  1. ha prakalpa khup changlaa ahe. shubhechhaa.

  2. This whole series is looks interesting. I am reading all lectures.

  3. Thanks for this article series. This is very useful and giving me a lot of guidance.

  4. sir, mala hya shetrat carier karych ahe
    Tar survatila me kay kele pahije.

  5. Dhanyawaad Bharat! Pahilyanda hi series sampurn vachun purna hou det. Tyanantar baryach common pranshanchi uttare miltil. Tyavyatirikta ankhi kahi mahiti havi asel tar mi nakki madat karen.

Pingbacks

  1. कॉम्प्यूटर अॅनिमेशन | Advaita Studios
  2. अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Pre-Production | Advaita Studios