Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
24
Dec

A09- अॅनिमेशन प्रोजेक्ट पाईपलाईन: Production-Rendering

Project Execution Pipeline चे वेगवेगळे टप्पे आपण आतापर्यंत पहिले. Pre-Production मधे आपण कथा, स्टोरीबोर्ड, स्क्रिप्ट इ. बद्दल माहिती घेतली. त्यानंतर प्रोडक्शन या भागात 3D मॉडेलिंग, सरफेसिंग्, अॅनिमेशन, रिगिंग् इ. टप्पे पहिले. या नंतर येतो तो हा Record किंवा rendering चा टप्पा. अॅनिमेशनपटाच्या प्रॉडक्शनमधला रेंडरींग हा तसा शेवटचा टप्पा. यानंतर थेट पोस्ट-प्रोडक्शनला सुरुवात होते. तर आता आपण या रेंडरींग् विषयी बोलूया.

Project-Pipeline-PipeB-960x450 Slide3. Rendering (रेंडरींग्): तुम्हाला आठवतय? या लेखमालिकेच्या अगदी सुरुवातीच्या एका भागात, आपण Flipbook बद्दल बोललो होतो. सलग पानांवर चित्रं काढून अॅनिमेशन केलं होतं. तेंव्हा आपण बघितलं होतं की अशा प्रत्येक पानाला अॅनिमेशनच्या भाषेत एक एक फ्रेम म्हणतात. जेंव्हा आपण अशी पाने किंवा फ्रेम्स सलग व जलद गतीने बघतो तेंव्हा आपल्याला त्यातील चित्रं एकसंध किंवा एकच वाटतात. जणू ती खरोखरच हालताहेत असा भास होतो.

Q: हो, त्या बॉलच्या उदाहरणात असं वाटत होतं की तो खरंच उद्या मारत आहे. आपल्याला हे लक्षात सुद्धा येत नाही की त्याच्यात खरं तर बॉलची अनेक वेगवेगळी चित्रं आहेत ते.

अॅनिमेशन फिल्म तयार करण्यासाठी आपल्याला अशी चित्रांची मालिका तयार करणं गरजेचं असतं. अशी सलग चित्रांची किंवा इमेजेसची मालिका जोडून एक व्हिडीओ तयार होतो. जो आपण आणि आपले प्रेक्षक पाहू शकतात. अशा या एक एक चित्रं तयार किंवा record करण्याच्या पद्धतीला अॅनिमेशनच्या भाषेत Rendering (रेंडरींग्) म्हणतात.

3D Animation Software मधे रेंडरींग करताना काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. ज्यामधे सरफेसिंग, लाईटिंग आणि कॅमेरा या ३ प्रमुख गोष्टींचा समावेश असतो.

Q: इथेही ३ गोष्टी आहेत. या ३ ची काहीतरी जादूच आहे असं वाटतंय.

हो, पण ते खरंच आहे. फोटो काढण्यासाठी खरंच कोण-कोणत्या गोष्टी लागतात?

एकतर कॅमेरा. त्यानंतर फोटो काढण्यासाठी एखादी वस्तू किंवा व्यक्ती इ. आणि लाइट. ३ मुख्य गोष्टी. याच्यापैकी एक जरी नसेल तरी मग तो फोटो कसला. या रेंडरींग मधेही आपण याच ३ गोष्टी बघतोय. सरफेसिंग म्हणजे वस्तूच्या रंग आणि इतर सर्व दृश्य बाबी. शिवाय लाईट आणि कॅमेरा हे ओघानी येतातच.

Q: हं, बरोबर वाटतंय.

आपण याच गोष्टी आता एकेक बघूया.

Surfacing (सरफेसिंग्): आधीच्या मॉडेलिंगच्या टप्प्यात वस्तूचा आकार, ठेवण ई गोष्टी बनवल्या जातात. त्यानंतर सरफेसिंगच्या टप्प्यात त्या वस्तूचा पृष्ठभाग कसा दिसत असेल हे ठरवलं जातं. म्हणजे त्या वस्तूचा रंग कोणता असेल, ती गुळगुळीत असेल की खरखरीत, काचे सारखी पारदर्शक असेल की आरश्यासारखी परावर्ती असेल? मेणासारखी असेल की त्यातून प्रकाश आरपार गेल्यावर भिंगासारखा एकवटेल? इत्यादी अनेक बाबींचा विचार या भागात केला जातो. थोडक्यात ती वस्तू कोणत्या पदार्थापासून बनलेली आहे, याचा आभास निर्माण केला जातो. उदा. धातू, काच, माती, प्लास्टिक, लाकूड, कापड इत्यादी. सरफेसिंग् नंतर वस्तू अनेक पटींनी वास्तववादी किंवा जिवंत दिसू लागते, अगदी खरी असल्यासारखी भासू लागते.

Multiple-Materials-2WebLighting (लाईटिंग): कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडल्याशिवाय ती आपल्याला दिसू शकत नाही. त्यामुळे रेंडरींग करताना लाईट कुठे आणि कसे असायला पाहिजेत हे फार महत्वाचं ठरतं. सॉफ्टवेअर मध्ये अनेक प्रकारे लाईटिंग करता येतं. त्यामुळे अगदी स्टुडीओ सारखी किंवा नैसर्गिक प्रकाश योजना करता येते. त्यामुळे आपल्या फिल्मचे शॉट आणखीन खुलून दिसतात. त्यामधे एक प्रकारच्या भावना निर्माण होतात. (Mood Lighting)

Cameras (कॅमेरा): या भागात चक्कं फोटोग्राफी प्रमाणे सगळी कॅमेऱ्याची करामत असते. एखादी वस्तू किंवा कॅरेक्टर कोणत्या बाजूने दाखवलं की शॉट चांगला येईल किंवा त्याचा अपेक्षित प्रभाव जाणवेल, हे ठरवता येतं. फोटो काढताना किंवा व्हिडीओ शुटींग करताना जसं कॅमेरा अँगल, फ्रेमिंग, लेन्स आणि इतर सेटिंग्स असतात तसंच इथेही अशी सगळी सेटिंग असतात.

या तीन प्रमुख गोष्टींचा विचार करून 3D Software संपूर्ण अॅनिमेशनचं रेंडरींग् करतं. एक एक करत सगळ्या फ्रेम्सच्या इमेजेस तयार होतात. अॅनिमेशन सोफ्टवेअरमध्ये अशा प्रकारे चित्रं किंवा इमेजेस तयार करण्यासाठी एक विशेष भाग असतो. जो आपल्या सेटिंग नुसार अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया करून आपल्याला Final Output देतो. जसं गाडीचं इंजिन पेट्रोलसारख्या इंधनाचा वापर करून आणि त्यावर प्रक्रिया करून गाडी ढकलण्याचं Output देतं, अगदी तसंच. त्यामुळे सोफ्टवेअर मध्येही या विशेष भागाला Rendering Engine (रेंडरींग् इंजिन) म्हणतात. आपण केलेल्या 3D मॉडेलचं चित्रांमध्ये रुपांतर करण्याचं काम हे रेंडरींग् इंजिन करतं. अशी तयार झालेली चित्रं JPG किंवा PNG अशा सारख्या image format मधे असतात. आपण ती प्रिंट करू शकतो. किंवा ही सगळी चित्रं एकत्र करून त्याचा एक व्हिडीओ बनवू शकतो. जो आपल्याला टिव्ही किंवा थियेटरच्या स्क्रीनवर पाहता येतो.

 

आता पुढच्या भागात आपण शेवटच्या टप्प्याबद्दल म्हणजे पोस्ट प्रोडक्शन बद्दल माहिती घेऊ. आणि लवकरच आपण Volume 2 सुरु करणार आहोत. तेंव्हा परत भेटायला विसरू नका. 

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.