Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
07
Jan

B01- आपल्या अॅनिमेशन फिल्मची कथा

नमस्कार. ‘चला शिकूया 3D Animation’ या फ्री ट्रेनिंग सिरीजच्या दुसऱ्या व्हॉल्यूममधे मी महेश देशपांडे आपलं स्वागत करतो. आपण सगळेजण Volume 1 मधे माझ्या बरोबर राहिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. या भागापासून आपण Volume 2 मधल्या लेखांची सुरुवात करतोय. आता आपण आपल्या पहिल्या शॉर्ट-फिल्म बद्दल गप्पा मारणार आहोत. ही फिल्म छोटीशी असली तरी त्यानिमित्तानी आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. ही फिल्म तयार करण्यासाठी आपण अर्थातच 3D Animation टेक्निकस् वापरणार आहोत. त्यामुळे पुढचे काही दिवस खूप धम्माल येणार आहे.

आपल्या शॉर्ट-फिल्मची गोष्टं आहे एका छोट्याश्या दिव्याची.
old Lamp

अं! थोड्या आधुनिक दिव्याची!
Tingu

हं. हा छोटासा टेबललॅंप आपल्या फिल्मचा हिरो आहे. याचं नाव आहे टिंगू.

आणि याला तुम्ही ओळखतंच असाल.
Google-Rubiks

Q: हा तर रुबिक्सचा जादूचा क्यूब आहे.

हो, पण हा साधासुधा जादूचा क्यूब नाहीये. हा ‘खरंच जादूई’ जादूचा क्यूब आहे.
एकदा आपल्या छोट्याश्या ‘टिंगूनी’ ठरवलं की या क्यूबचे सगळे रंग बरोबर लावायचे.
ठरवल्याप्रमाणे तो तसं करतो सुद्धा.
आता तो ते नक्की कसं करतो प्रत्यक्ष पडद्यावरच बघा.

(थेटर चा पडदा उघडतो.)

cs3d-b01-1-curtain

(पाटी येते : टिंगू.)

cs3d-b01-2-Tingu

(मग मुंग्या दिसतात.)

cs3d-b01-3-Noise-giphy

अरे पडद्यावर बघा काय?
आपण अजून फिल्म बनवलीयेच कुठेय?

cs3d-b01-4-Mask

असो. गमतीचा भाग सोडून द्या.

आपली गोष्ट अशी आहे की एकदा हा टिंगू झोपेतून उठल्यावर त्याला रुबीक्स क्यूब दिसतो. त्यामुळे टिंगू त्याचे सगळे रंग बरोबर लावण्याचा प्रयत्न करायला लागतो. पण बऱ्याच वेळा ट्राय करूनही त्याला ते काही जमतच नाही. शेवटी चिडून तो क्यूब डोक्यानी उडवून लावतो. त्यामुळे क्यूब मागच्या भिंतीवर आपटून पडतो. तर काय आश्चर्य त्याचे सगळे रंग एकदम परफेक्ट लागलेले असतात. ते बघून आधी टिंगू दचकतो पण नंतर खात्री करून घेण्यासाठी पुन्हा तसं करून बघतो. तर सगळे रंग मिक्स होतात. आणि पुन्हा फेकल्यावर रंग परत बरोबर लागतात. टिंगूला एकदम मजा वाटते आणि तो आनंदानी उड्या मारतो. आणि आपली फिल्म इथेच संपते.

आपली ही शॉर्ट-फिल्म या छोट्याशा गोष्टीवरच आधारलेली आहे. ही इतकी छोटीशी संकल्पना मी का निवडली ते तुम्हाला नंतर लक्षात येईलच. पण तुम्हाला आपल्या फिल्मची साधारण संकल्पना लक्षात आली असेल.

Q: मला तर आत्ताच ‘टिंगू’ क्यूब सोडवताना दिसतोय. मला वाटतं ही फिल्म मस्त होईल.

तुम्हाला माहितीये जगातील पहिली पूर्ण-लांबीची 3D animation फिल्म म्हणजे “TOY STORY”. ही फिल्म १९९५ साली रिलीज झाली होती. आणि ती बनवली होती PIXAR (पिक्सार) नावाच्या एका कंपनीने Walt Disney Company बरोबर. या PIXAR कंपनीचा Brand ambassador आणि लोगो या अशाच एका टेबललॅंपवर आधारलेला आहे. किंबहुना आपला टिंगू या PIXAR च्या टेबललॅंपवरूनच प्रेरित झाला आहे, असं म्हणता येईल.

आपली ही छोटीशी फिल्म तयार करणं हे आता आपलं ध्येय असणार आहे. त्यामागचा आपला उद्देश असा आहे की, त्या निमित्तानी आपल्याला 3d Animation शास्त्राची ओळख होईल. आणि नुसती ओळखच नाही तर तुमच्यापैकी काहीजण तर थेट करिअर म्हणून ते निवडू शकाल. किंवा आणखी खोलात जाऊन शिकायचं ठरवू शकाल. आणि काही अडलं तर मी आहेच ना. हे सगळं करायला आपण computer आणि काही डीजीटल software माध्यम म्हणून वापरणार आहोत. आपण आधी बघितल्याप्रमाणे या फिल्मची Script लिहिणार आहोत, स्टोरीबोर्ड काढणार आहोत. हे सगळं करायला लागणारी सोफ्टवेअरपण बघणार आहोत. आपल्या फिल्मला लागणारी काही कॅरॅक्टर्स म्हणजे टिंगू, क्यूब आणि इतर काही बॅकग्राउंडची 3d मॉडेल्स तयार करणार आहोत. ही सिरीज बघून तुम्हीही हे सगळं करून बघू शकाल. काही किचकट मॉडेल्स मी तुम्हाला थेट डाऊनलोड करायला देणार आहे. म्हणजे आपला वेळ वाचेल. असंच टप्प्या-टप्प्यांनी पुढे जात आणि शिकतशिकत आपण ही फिल्म पूर्ण करणार आहोत.

या आणि अशा सर्व लागणाऱ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी पुढे सांगणारच आहे. तेंव्हा परत भेटायला विसरू नका. आणि हो तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न किंवा सूचना मला नक्की कळवा.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.