Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
14
Jan

B02- पूर्वतयारी

आता आपण, आधी ठरल्याप्रमाणे आपली छोटी अॅनिमेशन फिल्म तयार करायला सुरुवात करणार आहोत. तेही आधी बघितल्याप्रमाणे प्री-प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट-प्रोडक्शन अशा टप्प्यामधून क्रमाक्रमाने पुढे जात जात. त्यासाठी आपण आपल्या कथेप्रमाणे स्टोरीबोर्ड तयार करणार आहोत. पुढे अर्थातच गरजेप्रमाणे 3D मॉडेलिंग, सरफेसिंग, अॅनिमेशन आणि नंतर प्रत्येक शॉटचं रेंडरींग करणार आहोत. सर्वात शेवटी काही स्पेशल-इफेक्ट्स देऊन कंपोझिटिंग आणि एडिटिंगही करणार आहोत.

Project-Pipeline-PipeA-926D

त्या निमित्तानी आपल्याला 3DCG अर्थातच 3D कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या विविध अंगांची प्रत्यक्ष ओळख होईल. हे सर्व करायला आपल्याला निश्चितच काही सोफ्टवेअरची आवश्यकता भासणार आहे. आपलं काम सहज व्हावं म्हणून आपण काही फ्री सोफ्टवेअर्स वापरणार आहोत. मी तुम्हाला गरजेप्रमाणे त्याच्या डाऊनलोड लिंक्स देणार आहे. मात्र त्याआधी तुमची काय पूर्वतयारी असायला हवी हे आता सांगत आहे.

ही संपूर्ण लेखमालिका कॉम्प्युटर ग्राफिक्स या क्षेत्राचं आकर्षण असणाऱ्यांपासून ते या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघणाऱ्या तुम्हा सर्वांना उद्देशून लिहिली गेली आहे. त्यातही आपण प्रामुख्याने 3D ग्राफिक्स बद्दलच बोलत आहोत. यासाठी असलेली सर्वात मुख्य अट म्हणजे तुमची मनापासून पुढे जाण्याची इच्छा असायला हवी. तुमचा सक्रीय सहभाग असायला हवा. इतर काही तांत्रिक बाबी इथे मांडत आहे.

1. हार्डवेअर: आपण पुढची जवळपास सर्व कामं ही कॉम्प्युटरवर करणार असल्यामुळे अर्थातच तुमच्याकडे एक कॉम्प्युटर उपलब्ध असायला हवा. ही आपली प्राथमिक गरज असणार आहे. त्याची खास अशी काही configuration ची अट नाही. तो अद्ययावत नसला किंवा थोडा कमी क्षमतेचा असला तरी सुरवातीला आपल्याला तसा काही फरक पडणार नाही. Intel किंवा AMD अशासारख्या कोणत्याही प्रोसेसरवर आधारित हार्डवेअर चालू शकेल. त्यामुळे तुम्हाला लगेच कुठलीही काळजी करण्याची गरज नाही.

मी वेळोवेळी तुम्हाला जी सोफ्टवेअर्स उपलब्ध करून देणार आहे, ती डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट उपलब्ध असणं महत्वाचं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण अधिक सहज व जलद संवाद साधू शकणार आहोत. पुढे मी तुम्हाला बऱ्याच डाउनलोड लिंक्स देणार आहे. शिवाय पुढच्या काही भागांमध्ये अनेक व्हिडिओज आहेत. त्यासाठीसुद्धा इंटरनेट गरजेचं आहे.

(टीप: आमच्या ऑफिसला भेट देणं शक्य असेल तर तुम्हाला हा संपूर्ण सेट मोफत मिळू शकतो.)

2. ऑपरेटिंग सिस्टीम (OS): आपण जी सोफ्टवेअर्स वापरणार आहोत त्यातील बहुतेक सर्व सोफ्टवेअर्स ही कोणत्याही प्रमुख ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकतात. त्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरवर विंडोज, मॅक किंवा लिनक्स इत्यादीपैकी कोणतीही OS असली तरी चालेल. मात्र तुम्हाला कॉम्प्युटर हाताळण्याचं मुलभूत ज्ञान आहे हे गृहीत धरूनच आपण पुढे जाणार आहोत.

3. सोफ्टवेअर्स: या लेखमालिकेचा उद्देश कोणतं एखादं ठराविक सोफ्टवेअर शिकवण्याचा नसून सर्वांना कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या विविध मुलभूत संकल्पनांची ओळख करून देण्याचा आहे. अशा संकल्पना सर्व सोफ्टवेअर्समधे साधारण सारख्याच असतात. सोफ्टवेअरची निवड खरंतर व्यक्तीसापेक्ष बदलेल. आपल्या पूर्वज्ञानानुसार आणि आवडीनुसार तुम्ही कोणतीही सोफ्टवेअर्स वापरण्यास स्वतंत्र आहात.

मात्र आपल्या या गप्पांमध्ये सुसूत्रता असावी आणि संभाषण सोपं व्हावं म्हणून मी काही सोफ्टवेअरची निवड केली आहे, आणि या लेखमालिकेपुरता आपण सर्वजण त्यांचा वापर करणार आहोत. यातील प्रमुख 3D सोफ्टवेअर तर पूर्णपणे चकटफू आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर निश्चिंतपणे आणि अधिकृतपणे करू शकाल. हे सोफ्टवेअर तुम्ही अगदी व्यावसाईक उद्देशाने किंवा आर्थिक मिळकतीसाठी देखील मोफत वापरू शकाल. त्यामुळे इतर सर्व सोफ्टवेअरचा व त्यांच्या निर्मात्यांचा आदर राखून आपण ही सोफ्टवेअर वापरणार आहोत. सोफ्टवेअर्स बद्दल आपण पुढे विस्ताराने बोलूच.

एकदा अशी तयारी झाली की तुम्ही 3D जगात शिरण्यासाठी सज्ज व्हाल. तुम्हाला काही तांत्रिक अडचण असेल तर मला नक्की कळवा. या लेखांच्या व्यतिरिक्त काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तेही अगदी निःसंकोच मला विचारा. खाली तुमच्यासाठी खास ‘Leave a Reply’ सेक्शन आहेच. तेंव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

6 comments

  1. Jagannath Fadatale June 28, 2016 at 11:15 pm

    सर मला पण 3D एनिमेशन शिकायच आहे तर मी काय करू लवकर सांगा

  2. आणखी काही माहिती हवी आहे का?

  3. जगन्नाथ, लेख वाचून झाले का? ब्लेंडर मध्ये काही practice करून बघितली का?

Pingbacks

  1. सॉफ्टवेअर्स बद्दल | Advaita Studios
  2. B01- आपल्या अॅनिमेशन फिल्मची कथा आणि ओळख | Advaita Studios
  3. B06- ब्लेंडर इंटरफेस | Advaita Studios