Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
21
Jan

B03- सॉफ्टवेअर्स बद्दल

आपल्या टिंगू शॉर्ट-फिल्म साठी आणि खासकरून त्यातलं 3d प्रकारातलं काम करण्यासाठी आपण जे सॉफ्टवेअर वापरणार आहोत, त्याचं नाव आहे ‘ब्लेंडर’ (Blender). तुम्ही कदाचित 3d studio MAX किंवा MAYA ही नावं ऐकली असतील. ब्लेंडरही याच प्रकारातलं एक 3D सोफ्टवेअर आहे. अर्थात कालांतरानी तुम्ही इतरही सॉफ्टवेअर्स नक्की वापरून बघा. कारण शेवटी एखाद्या सॉफ्टवेअरपेक्षा त्याचा वापर महत्वाचा असतो. सगळ्या सॉफ्टवेअर्समधे मुलभूत संकल्पना साधारण सारख्याच असतात. आपलं कौशल्य महत्वाचं असतं. हे आपण मागच्या भागात बघितलंच आहे.

आपण ब्लेंडर निवडण्याचं सर्वात मोठं कारण असं की ते फ्री आहे. तुम्ही सगळे जण ते अगदी अधिकृतपणे वापरू शकाल. ते इन्स्टॉल करायलाही अगदी छोटं आणि सोपं आहे. शिवाय नुसती किंमत हा मुद्दा नाहीये, तर गुणवत्तेच्या बाबतीतही ब्लेंडर खुपच उत्तम कामगिरी करतं. जगभरात अनेक जण, अनेक Animation स्टुडीओज् आणि फिल्म मेकर्स मोठ्याप्रमाणात ब्लेंडर वापरतात. आमच्या अद्वैत स्टुडीओज् या कंपनीतही, गेली अनेक वर्षे आम्ही आमची सगळी कमर्शियल कामं, ब्लेंडरवरंच करत आलो आहोत. त्यामुळे ते इतक्या वर्षात एकदम ‘प्रुव्हन’ झालं आहे.

ब्लेंडरचा वापर करून तुम्ही सुद्धा 3d Animation गटातली जवळपास सगळ्या प्रकारची कामं करू शकता. मला सर्वात जास्त आवडलेलं, ब्लेंडरचं वैशिष्ठ्य असं की ते शिकायला खूप सोपं आणि सुटसुटीत आहे. इतर 3D सॉफ्टवेअर्सच्या मानानी ब्लेंडर शिकायला कमी वेळ लागतो. ब्लेंडरमधे 3d modeling ते animation आणि texturing ते rendering या सगळ्यासाठी खूप छान टूल्स आहेत. अगदी टेक्नीकल भाषेत बोलायचं झालं तर Sculpting, 3d Painting, Motion capture, Camera Tracking, Game development, particles, Compositing, Video-editing, programming आणि simulations अशी अनेक नावं घेता येतील.

आपल्या चालू सिरीजमधे, आपण यातले बरेच प्रकार वापरणार आहोत. आणि इतर बाबतीत तुम्हाला काही अधिक माहिती घ्यायची इच्छा असेल तर मला नक्की सांगा. किंवा आमची इतर काही फ्री आणि प्रो ट्रेनिंग सेशनस् नक्की बघा. मी वेळोवेळी वेबसाईटवर मोफत आणि कमर्शिअल असे अनेक कंटेंट उपलब्ध करणार असल्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. याशिवाय आमच्या कोथरूड, पुणे इथल्या स्टुडीओत पण आम्ही काही लिमिटेड बॅच ट्रेनिंग चालवतो, तुम्ही त्याचीही चौकशी करू शकता.

असो, तर अशाप्रकारे तुम्ही अगदी आवडीने, ब्लेंडर आत्मसात करू शकता. आपण मागे बघितल्याप्रमाणे, तुमच्याकडे कोणताही साधारण कंप्युटर असेल आणि त्यावर Windows, Mac किंवा Linux अशी कोणतीही ऑपरेटिंग सिस्टिम असेल तरी त्यावर तुम्ही ब्लेंडर वापरू शकाल. ब्लेंडर व्यतिरिक्त आपण इतरही काही सॉफ्टवेअर्स वापरणार आहोत. जसं स्टोरिबोर्डची चित्रं काढण्यासाठी ‘फोटोशॉप’ किंवा तशा प्रकारचं एखादं सॉफ्टवेअर आणि स्क्रिप्ट लिहिण्यासाठी वर्ड सारखं सॉफ्टवेअर इत्यादी. अर्थात आपण या सिरीजमधे आपला मुख्य वेळ ब्लेंडर वरच घालवणार आहोत. हे ब्लेंडर सॉफ्टवेअर कसं वापरायचं ते आपण पुढे नीट शिकणारच आहोत.

तोपर्यंत, मला प्रश्न विचारायला किंवा तुमचा फीडबॅक आणि सूचना सांगायला मात्र विसरू नका.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.