Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
11
Feb

B06- ब्लेंडर इंटरफेस

आता आपण ब्लेंडर कसं वापरायचं ते हळू हळू बघणार आहोत. जर तुमचे आधीचे काही भाग वाचायचे राहिले असतील, तर आधी ते नक्की वाचून घ्या. विशेषतः या व्हॉल्यूम मधला दुसरा भाग. कारण पुढे जाण्याआधी तुमची पूर्वतयारी असणं गरजेचं असणार आहे.
blender-logo-socket
ब्लेंडर सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तुम्हाला ते तुमच्या कंप्युटरवर इन्स्टॉल करावं लागेल. त्याची डाउनलोड पेजची लिंक मी इथे देत आहे:

http://www.blender.org/download/

या पेजवर तुम्हाला वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी ब्लेंडरचं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करता येईल. आत्ता (म्हणजे फेब्रुवारी २०१५ ला) ब्लेंडरचं 2.73 हे लेटेस्ट व्हर्जन उपलब्ध आहे. तुम्ही ही आपली फ्री-ट्रेनिंग सिरीज वाचताना कदाचित ब्लेंडरचं आणखीही नवीन व्हर्जन असेल. तुम्ही तुमच्या कंप्युटरनुसार Windows, Mac किंवा Linux साठी ब्लेंडर डाउनलोड करू शकाल. विंडोजसाठी इन्स्टॉलर डाउनलोड करून त्याला डबल-क्लिक केल्यावर ब्लेंडर इन्स्टॉल करता येईल. मॅक आणि लिनक्ससाठी एक झीप फाईल डाउनलोड करून ती अनझिप केली की ब्लेंडर चालू करता येईल. जर तुम्हाला ब्लेंडर इन्स्टॉल करताना काही अडचण आली, तर मला निःसंकोच विचारा. खाली “Leave a Reply” section मध्ये लिहून तुम्ही माझ्याशी थेट संपर्क करू शकता.

असो. तर आता आपण असं समजू की तुमच्या कंप्युटरवर ब्लेंडर इन्स्टॉल झालं आहे. ते पहिल्यांदा चालू केलं की साधारण असं दिसेल.

CS3D-B06-01-Blender-SplashScreen

मध्यभागी जी मोठ्ठी इमेज दिसतीये तिच्यावर क्लिक केल्यावर ती जाऊन मुख्य ब्लेंडर दिसेल.

<img class="aligncenter size-full wp-image-1591" src="http://advaita-studios.com/wp-content/uploads/2015/02/CS3D-B06-02-Blender-Default.jpg" alt="CS3D-B06-02-Blender-Default" width="711" height="400" srcset="http://advaita-studios.com/wp-content/uploads/2015/02/CS3D-B06-02-Blender-Default check my reference.jpg 711w, http://advaita-studios.com/wp-content/uploads/2015/02/CS3D-B06-02-Blender-Default-300×169.jpg 300w, http://advaita-studios.com/wp-content/uploads/2015/02/CS3D-B06-02-Blender-Default-400×225.jpg 400w” sizes=”(max-width: 711px) 100vw, 711px” />

आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे ब्लेंडरच्या इंटरफेसचे काही मुख्य भाग पडतात.

CS3D-B06-03-Blender-Viewport

मधल्या सगळ्यात मोठ्या जागेत तुम्हाला एक ठोकळा दिसेल. या जागेला ‘3D Viewport’ म्हणतात. याच सेक्शनमध्ये आपण 3D model वेगवेगळ्या बाजूनी बघू शकतो आणि त्याच्यावर काम करू शकतो. आत्ता तुम्हाला या 3D Viewport मध्ये एक ठोकळा दिसत असेल, त्याच्या मध्यभागी तीन दिशांना जाणारे तीन बाण दिसतायत. त्यांना रंगसुद्धा तीन आहेत. लाल, हिरवा आणि निळा, बरोबर?

Q: हो, सापडले.

हेच आपले X, Y, Z दिशांचे Axis. त्या ठोकळ्याच्या बाहेर एक ग्राफ पेपर सारखी ग्रिड दिसतीये. याच ग्राफचा मध्य (0,0,0) मानून ब्लेंडरमध्ये बाकी सगळी मोजमापं होतात. आपण मॉडेल तयार करताना या सर्व गोष्टी खूप उपयोगाच्या असणार आहेत. ब्लेंडर मध्ये काम करताना तुम्हाला स्क्रोल व्हील चा माउस आणि की-बोर्डचा वापर करावा लागेल. या 3D Viewport मधला क्यूब किंवा ठोकळा वेगवेगळ्या बाजूंनी बघण्यासाठी तुमचा माउस त्या क्यूबच्या जवळ आणा. आणि माउसचं मधलं बटण (म्हणजेच स्क्रोल व्हील) दाबून माउस हालवून बघा. म्हणजे तुम्ही क्यूबकडे वेगवेगळ्या बाजूनी बघू शकाल. बघा, बघा! प्रत्यक्ष करून बघा!
जमलं का?

Q: हो, wow.

असंच जर तुम्ही माउसचं स्क्रोल व्हील वर-खाली फिरवून बघितलंत तर तुम्ही क्यूब जवळून किंवा लांबून बघू शकता. आणि जर तुम्ही डाव्या-हातानी की-बोर्डवरची ‘Shift’ की दाबून ठेऊन आणि माउसचं स्क्रोल व्हील दाबून माउस हलवलात तर तुम्हाला क्यूब आणि संपूर्ण 3D view बाजूला सरकवून बघता येईल. या पद्धतींचा वापर करून तुम्ही त्या क्युब्कडे किंवा अशा कोणत्याही मॉडेलकडे सर्व बाजूंनी बघून काम करू शकता.

Q: हो, मला जमतंय. हे एकदम इंटरेस्टिंग आहे.

3D Viewport च्या उजव्या बाजूला वरती जो एक मोठा सेक्शन आहे त्याला ‘Outliner’ section म्हणतात.

CS3D-B06-04-Blender-Outliner

या सेक्शनमधे आपल्या चालू फाईलमधील सर्व मॉडेल्सची यादी दिसते. याचा उपयोग करून नंतर आपण आपली मॉडेलची फाईल नीटनेटकी ठेऊ शकतो.

3D Viewport च्या उजव्या बाजूला वरती जो एक सेक्शन आहे त्याला ‘Outliner’ section म्हणतात. या सेक्शनमधे आपल्या चालू फाईलमधील सर्व मॉडेल्सची यादी दिसते. याचा उपयोग करून नंतर आपण आपली मॉडेलची फाईल नीटनेटकी ठेऊ शकतो.

Outliner च्या लगेच खाली दिसतोय तो, ‘Properties’ सेक्शन.

CS3D-B06-05-Blender-Properties

यात आपण आपल्या मॉडेलच्या दृष्टीनी अनेक सेटिंग करू शकतो. याच सेक्शनमधे रेंडरींग आणि अॅनिमेशनच्या बाबतीतली अनेक टूल्स आहेत. त्यामुळे 3D viewport खालोखाल याच भागाचा उपयोग आपल्याला सगळ्यात जास्त होणार आहे.

ब्लेंडरमधे असे बरेच सेक्शन्स आहेत, त्यांच्याबद्दल आपण लागेल तसं बोलूच. पण सध्या पुन्हा viewport कडे वळूया.

Viewport मधे दिसणारा क्यूब आपण इकडे तिकडे हलवू शकतो. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे क्यूबच्या मधे आपल्याला तीन दिशांचे तीन बाण दिसतायत. या तीन दिशा म्हणजेच आपल्या ग्राफमधल्या x, y आणि z. आता या बाणांवर माउसनी क्लिक करून, माउस हलवला की क्यूब त्या दिशेला हलू शकतो. तुम्ही तीनही दिशांना क्यूब हलवून बघा. अशा प्रकारे आपण अनेक टूल्स वापरून आपण Modelling आणि Animation करू शकतो.

CS3D-B06-06a-Blender-CubeMoveX

आता आपण क्यूब सारखे आणखी काही आकार आणू. त्यासाठी माउसनी क्यूबच्या थोड्या बाजूला क्लिक करा. तिथे तुम्हाला एक Ring आलेली दिसेल. तिला ब्लेंडर मध्ये ‘3D cursor’ (कर्सर) म्हणतात. Viewport च्या खालच्या बाजूला एका मेनूबार मधे तुम्हाला ‘View’, ‘Select’, ‘Add’, ‘Object’ अशी काही बटन्स दिसतील. त्यातल्या ‘Add’ वर क्लिक करा आणि मग येणाऱ्या मेनू मधे ‘Mesh’ वर क्लिक करा. त्यात तुम्हाला एक छोटी यादी दिसेल. त्या यादीतील ‘Cylinder’ वर क्लिक करा. म्हणजे Viewport मधे एक नवीन ‘Cylinder’ आलेला दिसेल.

CS3D-B06-07a-Blender-AddCylinder

अशा प्रकारे तुम्ही आणखीही काही आकार त्या यादीतून आणू शकता. आता Cylinder ला हलवण्यासाठी त्याच्यावर माउसने Right Click करा. म्हणजे तो सिलेक्ट होईल. आणि त्याच्यावर बाण दिसतील. मगाचसारखं क्यूब प्रमाणे तुम्ही यालाही वेगवेगळ्या दिशांना हलवून बघा. शिवाय आधी बघितल्याप्रमाणे ही सगळी मॉडेल्स वेगवेगळ्या बाजूंनी फिरवूनही बघा.

आता पुढच्या भागात आपण ब्लेंडर बद्दल आणखी पुढची माहिती करून घेऊ. तोपर्यंत तुम्हीसुद्धा ब्लेंडरची ओळख नक्की करून घ्या. काही अडल्यास मला नक्की विचारा. नमस्कार.

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

5 comments

  1. Sir .. Majya compaq c 700 laptop madhe blendar 2. 77 install tar jhaley but te graphics saport karat nay boltey plz help mi sir … Plz …. Ka older version download karave sir… Plz tell me sir …. Naytar sir majya life madhala saglyat motha kshan miss hoil!…… Hi sir mi aaplya treining madhe etka bussy jhaloy na sir ….mala khup divsapasun animation shikayche hote but gharun engineering kar asa aadesh hota …. Mala animation nako karu bolle but mi akda asel aaplya trining che pahile sir mi atta 8 day pasun pahtoy tar mi khup bussy ahe yat mi khup barkaine study kartoy… Sir maje photo editing ani videos banvne majyasarkhe konalach jamat navte clg madhe sagle bolayche tu tu animation kar but gharche bolle tyat cariar ahe ka nay te aamhala nay mahit…. Sir khare tar sir mala engineering kade ajibar interest navta..ani mi tyat mala yeardrop pan lagla sir mi sagle sodun mi punyala yenar hoto ani night la company joind karnar hoto ani divasabhar animation class … Pan sir mala animation chi kahi mahiti bhetna… Ahamd nagar madhe konala kahi yatle jast mahit navtech… Tyamule mala sahi disha bhetna… Pan sir tumchya hya training mule sar sagle samjle tyat aapli matrubhasha marathitch ahe tyat tumhi khup explain karun sangitley sagle.. Ani te vyavastit samjat pan ahe but sir te software download keley but install pan jhaley pan graphics match hot nay sir kay karu sir help kara plz …. Older virsion gheu ka ??? Sir mi tar tumhala manapasun guru manleych ani tumhi pan mala shishya mana plz… Guru kas ahena jar aavadch asel tar khup lamb jau shaktot… Naytar nuste paishya sathi asel tar tar te kam jamt naste … Sir aaplyat manatun eccha ahe sir manatunch…. Aapan tumhala guru manun lay mothe honar …. Ani ak divas mi aapli gurudakshina nakki changli deil sir…..

    ……. Tushar avhad(8796410939)

Pingbacks

  1. B07- ब्लेंडर मधील Modeling | Advaita Studios
  2. C03- मॉडेलिंग- Book Rack | Advaita Studios
  3. B05- ब्लेंडरची ओळख | Advaita Studios
  4. C03- Modeling- Book Rack | Advaita Studios