Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
11
Mar

B10- पटकथा किंवा Script लेखन

पटकथा किंवा स्क्रिप्ट म्हणजे आपल्या प्रोजेक्टची लेखी स्वरुपात मांडलेली तांत्रिक माहिती. अशी तपशीलवार माहिती लिहिणं हा अर्थातच प्री-प्रोडक्शनचा भाग असतो. आणि तो बहुतेकवेळा बौद्धिक (Brainstorming) असतो. मूळ कथा आणि पटकथा यात खूप फरक असतो. मूळ कथा ही थेट वाचकांना उद्देशून तयार केलेली असते पण पटकथा किंवा स्क्रिप्ट ही फक्त प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी असते, प्रेक्षकांसाठी नाही. आपल्या मनातली संकल्पना एखाद्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवायची, याची अगदी बारकाईने आणि काळजीपूर्वक केलेली लेखी मांडणी म्हणजे स्क्रिप्ट. असं माध्यम जसं फिल्म असू शकतं तसंच नाटक, पुस्तकं, टिव्ही सिरिअल्स इतकंच काय तर अगदी व्हिडिओ गेमही असू शकतं. आपल्या संकल्पनेला, त्या-त्या माध्यमातून, प्रेक्षकांपर्यंत जास्तीत-जास्तं चांगल्या प्रकारे कसं नेता येईल याचा अभ्यास करून स्क्रिप्ट लिहिली जाते.

Q: मी स्क्रीन-प्ले बद्दल ऐकलंय, मग त्याच्यात आणि स्क्रिप्ट मध्ये काय फरक आहे?

टिव्ही सिरिअल किंवा फिल्मच्या स्क्रिप्टला ‘स्क्रीन-प्ले’ म्हणतात. स्क्रीनवर काय, कधी आणि कसं प्ले झालं पाहिजे ते अगदी तपशीलवार मांडलं की त्यालाच स्क्रीन-प्ले म्हणतात. आपली Animation Short-film याच प्रकारात मोडते. अशा स्क्रिप्टमधे कथा पडद्यावर कशी मांडली जाणार आहे, ते ठरवलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर फिल्मच्या स्क्रिप्टमधे Camera Angle हा खूपच महत्वाचा ठरतो. त्यामुळे आपल्या फिल्मच्या प्रत्येक शॉटचा Camera कुठे असेल, म्हणजे कॅमेरा क्लोज-अप असेल की लांबून असेल, आपली Characters त्यात कशी दिसतील याची खूप बारकाईनं नोंद केली जाते. नाटकाच्या स्क्रिप्टला ‘स्टेज-प्ले’ म्हणतात. पण नाटकाच्या थिएटरमधे प्रेक्षक एकाच बाजूने बघू शकतात त्यामुळे कॅमेरा आणि अशा काही बाबी इथे गौण होतात. पण त्याच वेळी कथेतली पात्रं कधी स्टेजवर येणार, काय बोलणार, किंवा त्यांची Acting इत्यादी गोष्टींची खूप ‘डी-टेल्ड’ माहिती लिहावी लागते. अशाच प्रकारे पुस्तकाच्या बाबतीतही आधी मुद्देसूद मांडणी करून मग पुस्तक लिहिलं जातं. एकदम जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आपली ही ‘चला शिकूया 3D Animation’ लेख-मालिकाच बघाना. या संपूर्ण मालिकेचं स्वरूप कसं असेल, त्याची विभागणी कशी असेल, कोणत्या भागात कोणते मुद्दे आणि लेख येतील, अशा अनेक बाबतीत मी आधी भरपूर Brainstorming करून मगच प्रत्यक्ष लिहायला सुरवात केली. म्हणजे थोडक्यात मी आधी या संपूर्ण सिरीजची स्क्रिप्टच तयार केली, त्यात सर्व तांत्रिक गोष्टींची अगदी तपशीलवार माहिती लिहिली. तिचाच आधार घेऊन आता प्रत्येक बुधवारी नवीन लेख लिहिणं सोयीचं होतं. त्यामुळे आपली दिशा भरकटत नाही.

स्क्रिप्टच्या गरजेनुसार प्रत्येक शॉटला ओळखण्यासाठी काही विशिष्ठ नावं आणि नंबर दिले जातात. गोष्टीतल्या पात्रांचे संवाद (Dialogues) असतील, तर प्रत्येक शॉट प्रमाणे Characters च्या नावापुढे त्यांचे Dialogues लिहिले जातात. Dialogues बरोबरच पार्श्वसंगीत (Background music) आणि इतर आवाजांचा तपशील लिहीला जातो. जरूर पडल्यास इतर काही तांत्रिक माहितीही लिहिली जाते. अशा लेखी स्क्रिप्टचं रुपांतर Visual किंवा चित्रांच्या भाषेत केलं की त्याला Storyboard म्हणतात. स्टोरीबोर्ड म्हणजे सुद्धा एक प्रकारची चित्रमय स्क्रिप्टच. चांगली स्क्रिप्ट लिहिणं ही खूप विचार-विनिमय करण्याची आणि त्यामुळे बौद्धिक मेहनतीची गोष्ट आहे.

स्क्रिप्ट लिहिण्याचेही काही प्रघात (Trends) आहेत. पूर्वीपासून थोड्याफार फरकानी स्क्रिप्ट्स तशाच लिहिल्या जातात. आणि त्याचे अनेक फायदेही आहेत. पूर्वी स्क्रिप्ट्स या हातानी लिहिल्या जायच्या. पण नंतरच्या काळात टाईप-राइटर जास्त प्रचलित झाला. सध्या कंप्युटरवर स्क्रिप्ट टाईप करतानाही तसाच टाईप-राइटर सारखा दिसणारा Courier फॉण्ट वापरला जातो. त्याची लिहिण्याची पद्धतही खूप साधी आणि सोपी ठेवली जाते. प्रत्येक नवीन शॉटच्या आधी त्याचा नंबर, ओळखण्यासाठी नाव, कॅमेरा आणि इतर माहिती इत्यादी लिहिली जाते. हे सगळं शक्यतो एका ओळीत लिहिलं जातं.
उदा.-

Shot 04- INT- Window closeup- Rain starts

इथे हा चौथा शॉट आहे हे लिहिलंय, कॅमेरा खोलीच्या आत आहे. (INT म्हणजे Internal) आणि खिडकीच्या जवळून बाहेर बघतोय. आणि गोष्टीत पाउस पडायला सुरुवात याच शॉट मध्ये होणार आहे, असं सगळं आपल्याला या ओळीतून कळतंय.

या मुख्य ओळीनंतर खाली नवीन Paragraph मधे शॉटचं वर्णन आणि घटना तपशीलवार लिहिल्या जातात. म्हणजे याच उदाहरणाबद्दल बोलायचं झालं तर स्क्रिप्ट अशी असू शकते.

Shot 04- INT- Window closeup- Rain starts.
Location ‘Hero’s room. Camera is near window looking outside. Wind is blowing speedily. The window panels are striking on the frame. The ‘Hero’ is seen from side angle. He is standing besides the window and gazing outside. Thinking deeply. Camera moves near his face. A big lightning flashes at background. Loud sound is heard and flashlight appears on his worried face. And it starts raining. Sound effects- Wind, Lightning and raining sounds.

अशाप्रकारे प्रत्येक शॉट बद्दल पूर्ण technical माहिती लिहून झाली की प्रत्यक्ष फिल्मच्या प्रोडक्शनसाठी तिचा खूप उपयोग होतो. खासकरून जेंव्हा आपल्या टीममध्ये अनेक जण असतील तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकसारख्याच प्रकारे तो शॉट यावा आणि सगळ्यांनी त्याचप्रकारे आपापली कामं करावीत, यासाठी स्क्रिप्ट अत्यंत महत्वाची ठरते.

Q: मग आपल्या फिल्मच्या स्क्रिप्टमध्ये काय असेल?

आपल्या ‘टिंगू’ short-film च्या स्क्रिप्ट-बद्दल बोलायचं झालं तर, त्यात आपण अनेक प्रकारची तांत्रिक माहिती लिहिणं गरजेचं असणार आहे. मागच्या एका भागात बघितल्या-प्रमाणे आपण आपल्या स्टोरीचे मुख्य तीन भाग पाडले होते. त्यांना ACT म्हणतात हे आपण बघितलं होतं. प्रत्येक ACT मध्ये आपली स्टोरी प्रेक्षकांसमोर कशी उलगडत जाईल ते आपण साधारण बघितलं होतं. पण आपली गोष्टं प्रत्यक्ष कशी मांडली की प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याचा आपल्याला बारकाइनी विचार करावा लागेल. प्रत्येक शॉट कसा असेल, त्यात काय घडेल, कथेतली घटना कुठे घडेल (location), कॅमेरा कुठे असेल, शॉट किती वेळचा असेल, स्क्रीनच्या फ्रेममधे काय काय दिसेल, काय दिसणार नाही, अशा अनेक मुद्यांचा विचार करून तो आपल्याला लिहून काढावा लागेल. याच बरोबर प्रत्येक शॉटची रंगसंगती आणि लाईटिंग कसं असेल. शॉट दिवसाचा असेल की रात्रीचा, अशा काही गोष्टीही मांडाव्या लागतील.

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

29 comments

 1. I learnt something !

 2. Thanks and glad you learnt. Please feel free to ask your queries, if any. 🙂

 3. sir, khup chan vatal ya lekhatun khup kahi samjal sir ek vinanti aahe mala patkathecha structure kasa asato to samazu shakel ka?

 4. Thank you Omkar for commenting. लेख आवडले हे ऐकून खूप आनंद झाला.
  पटकथेचं स्ट्रक्चर: पुढच्या काही भागात ‘टिंगू’ शॉर्ट-फिल्मची संपूर्ण पटकथा (स्क्रिप्ट) दिलेली आहे. कदाचित ते वाचल्यावर स्ट्रक्चर बद्दल आणखी कल्पना येईल. नाहीतर मी पुन्हा समजावून सांगीन. Don’t worry. 🙂

 5. very nice.. short and sweet introduction for new script writer.. if u dont mind pls msg me ur email id sir.. want few more things about films ..particularly marathi films

 6. Thanks abhijit for appreciation,
  you can get in touch with me through this same reply box.

 7. कुलदीप मोहीते November 15, 2015 at 11:44 am

  खुप सुंदर माहीती दिलीत सर तुम्ही. मी मराठी चिञपटासाठी कथा लिहीतोय..तुमच्या या लेखाने मला खुप काही समजल.

 8. धन्यवाद कुलदीप, या लेखांचा उपयोग होतोय हे ऐकून खूप समाधान वाटतंय. पुढचे लेख, विशेषतः व्हॉल्यूम C मधले, आणखी माहितीपूर्ण आहेत. माझी खात्री आहे की त्यांचाही उपयोग होईल. आणखी काही माहिती किंवा शंका असल्यास मला अवश्य विचारा.

 9. शिवाजी लोंढे February 26, 2016 at 1:30 pm

  सर लेख छान आहे. मी एका विषयावर लेखन करत आहे पण पटकथेच्या उद्देश्याने कसे लेखन करू क़ी कथेच्या हाच धागा सापडत नाहिये

 10. लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. माझ्या मताप्रमाणे ‘मूळ कथा’ आधी लिहिली गेली पाहिजे. त्यानंतर ती कोणत्या माध्यमातून मांडायची आहे हे ठरवायचं. जसं, फिल्म, पुस्तक किंवा नाटक इत्यादी. माध्यम ठरल्यावर मग ‘पटकथा’ लिहिता येईल. अर्थात यावर प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टीकोन असू शकतो.

 11. सचिन राजेंद्र पाटील May 12, 2016 at 3:48 pm

  अतिशय उपयोगी अशी माहिती आहे सर …आपले मनापासून धन्यवाद …!!!

 12. आपल्या प्रतिक्रिये-बद्दल खूप धन्यवाद.

 13. राहुल अर्जून बुगड़ June 13, 2016 at 3:34 am

  खुप छान माहिती सर पण आपली ही माहिती माझ्या फ़क्त 5% लक्षात आली कारण मला कोणतीही गोष्ट मला वाचून लक्षात येन्या पेक्षा काम त्यात काम करुण लक्षात येते मला पण सिनेमा बनवयची इच्छा आहे व् त्यों सिनेमा माझी स्वतःची स्टोरी स्वतः डायरेक्शन असावे अशी माझी इच्छा आहे तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला भेटु शकतो का आणि तुमच्या बरोबर स्क्रिप्ट कशी लिहावि तुमच्या बरोबर बसून त्याची माहिती घेऊ शकतो का तर प्लीज आर सहकार्य करा प्लीज प्लीज प्लीज

 14. राहुल, लेख आवडला हे ऐकून खूप बरं वाटलं. आपण पुढच्या आठवड्यात नक्की भेटण्याचा प्रयत्न करु. पण तो पर्यंत मला आपल्याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायला आवडेल. आपण सध्या काय करता? आणि फिल्म डाइरेक्ट करावी असं का वाटतं? कोणत्या प्रकारची कथा विचारात आहे?

 15. राहुल अर्जून बुगड़ June 16, 2016 at 4:35 pm

  सर्वात पहिला आपन माझे म्हणने वाचल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर.
  सर मी सध्या 1 साधा वर्कर आहे.
  आणि मला आता यात करियर करायच आहे तर प्लीज़ सहकार्य सर

 16. राहुल अर्जून बुगड़ June 19, 2016 at 3:39 pm

  सर rpl प्लीज

 17. खुप सुंदर माहीती दिलीत सर तुम्ही

  तुमच्या या लेखाने मला खुप काही समजल.

 18. सुभाष , लेख आवडतायत हे वाचून खूप आनंद झाला. काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असेल तर नक्की विचारा.

 19. आणखी काही माहिती हवीआहे का?

 20. Thanx sir i searching long time how to write script , i was wanna information on script in marathi language so i got it nice sir , you give me lot off information about script, so please send more information &knowledge of script about us

 21. Hi, Ved.
  I will surely help you.
  What exactly do you want more? Can you give me more details?

 22. शिवाजी लोंढे September 7, 2016 at 7:38 pm

  सर तुमच्या माहिती मार्गदर्शनाच्या आधारे मी कथा आणि पटकथा लिहून पुर्ण केली आहे पण या चित्रपटाच डायरेक्शन मीच कराव अस मला वाटतेय. पण मला यातला काही अनुभव नाही नक्की काय करू ते समजत नाहीये कृपया मार्गदर्शन करावे.

 23. डायरेक्शन करण्याची इच्छा असेल तर नक्की प्रयत्न करायला हवा. माझ्या कडून भरपूर शुभेच्छा.

 24. Thank you. Sir. Tumhi je kahi sangitl te khup Chan ahe ani amhala barich mahiti milali

 25. pratham dhanyawad sir,,,,,

  mi ek katha baryach divsane lihit aahe………….tyat aata tumchya margadarshanamule…. ek navi gati milali……lavkarach tya kadhecha chitrapat banel……

  khup khup dhanyawad…

Pingbacks

 1. B09- ब्लेंडर मधील Rendering | Advaita Studios
 2. B11-टिंगू आणि इतर स्केचिंग | Advaita Studios
 3. B09- ब्लेंडर मधील Rendering | Advaita Studios