Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
10
Jun

C02- 3D मॉडेलिंग ओळख

      फिल्मचा सेट अनेक प्रकारच्या प्रक्रियेतून तयार होतो.  शेवटचं render झालेलं चित्रं हाती यायच्या आधी त्याचं रंगकाम आणि Texture चं काम होतं. आणि त्याही आधी त्याचे घटक असलेली प्रत्येक मॉडेल्स तयार होतात. आपण इथून पुढे टप्प्या-टप्प्यानी मोडेलिंग पासून animation आणि rendering पर्यंत सर्व गोष्टी प्रत्यक्ष करून बघणार आहोत.

CS3D-C02A-Introduction

      आपण केलेल्या यादीतली सगळी मॉडेल्स तयार करून त्यांच्या जागी ठेवली की सेट बनत जाईल. वेगवेगळी मॉडेल्स एकत्र करून त्यांचा डिजिटल सेट तयार होतो. आपल्या फिल्मचा विचार केला तर त्यात टेबल, खुर्ची, कपाट, गजराचं घड्याळ आणि आपला ‘टिंगू’ अशी अनेक मुख्य मॉडेल्स आहेत. शिवाय भिंती, खिडकी, पडदे अशी इतरही मॉडेल्स आहेत. म्हणजेच आपल्या शॉर्ट-फिल्मचा सेट हा अशा अनेक घटकांपासून बनणार आहे.

CS3D-C02B-Object Intro

      यातला प्रत्येक घटक म्हणजे एक-एक 3D model आहे. कधी अशी 3D models ही टिंगू सारखी हलणारी पात्रं (Characters) असतात किंवा कधी टेबलासारखी निर्जिव वस्तू असतात. अशी प्रत्येक models हीसुद्धा अनेक छोट्या भागांपासून बनलेली असतात. आता आपण मोडेलिंगच्या दृष्टीकोनातून बघू.

      आपल्या टिंगूचंच उदाहरण घेऊ. टिंगू म्हणून हे एकंच 3D Model आहे. पण प्रत्यक्षात त्याचे सुद्धा आपण अनेक भाग विचारात घेऊ शकतो. उदा. त्याचं डोकं, त्यातला दिवा, त्याचं धड? किंवा तसे पार्टस आणि त्याचा पाया (बेस प्लेट).

CS3D-C02C-Object-Parts-01

      टिंगूचं मुख्य मॉडेल अशा अनेक छोट्या पार्ट पासून तयार होतं. अशा छोट्या पार्ट-च्या ग्रुपलाच जणू मुख्य मॉडेल म्हणतात. आपल्यालाही सगळी 3D models तयार करताना असं पार्ट बाय पार्ट काम करावं लागेल. जसं आपण पूर्ण animation एकदम न करता शॉट बाय शॉट काम करणार आहोत अगदी तसंच.

      आणखी तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर असे सगळे भाग हे सुद्धा काही मुलभुत भौमितिक आकारांपासून बनलेले असतात. म्हणजे जसं बिंदुपासून रेषा तयार होते, अशा तीन किंवा चार रेशांपासून त्रिकोण किंवा चौकोन तयार होतो आणि अशा आकारांची विशिष्ठ रचना केल्यावर घन आकृत्या तयार होतात तसं. ब्लेंडर सारख्या सगळ्या 3D सॉफ़्ट्वेअर्स मध्ये याच प्रकारे मॉडेल्स तयार होतात. मुख्य आकार हे चौकोन किंवा त्रिकोणानपासून तयार होतात. अशा चौकोनांना Polygon म्हणतात. त्यांच्या चार बाजूंना edge म्हणतात आणि त्यांच्या शिरोबिंदूना vertex म्हणतात.

CS3D-C02D-Edit-Mode-Tingu-01

CS3D-C02E-Edit-Mode-Clock-01

      पुढच्या काही भागात आपण अशी काही मॉडेल्स प्रत्यक्ष करून बघणार आहोत. आणि काही अवघड मॉडेल्स मी तुम्हाला समजून सांगून थेट डाउनलोड करायला देणार आहे. मॉडेलिंगच्या नंतर त्यांचा सेट करून क्रमाक्रमाने Animation आणि rendering इत्यादीतून आपण पुढे जाणार आहोत. तेंव्हा पुन्हा भेटायला विसरू नका.

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.