Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
17
Jun

C03- मॉडेलिंग- Book Rack

      व्हॉल्यूम 2 च्या काही भागांमध्ये आपण ब्लेंडरची ओळख करून घेतली आहे. ब्लेंडर कसं वापरायचं, Cube सारखे सोपे object कसे आणायचे आणि त्यांचा आकार लहान-मोठा कसा करायचा ते आपण बघितलं आहे. त्यामुळे आता आपण आपलं पाहिलं मॉडेल तयार करायला घेऊ.

      त्याची तयारी म्हणून सुरवातीला तुमच्या कम्प्युटरमध्ये ‘Tingu’ नावाचं एक फोल्डर तयार करून ठेवा. आणि त्याच्या आत, आपण आधी बघितल्याप्रमाणे आणखी 4 फोल्डर्स तयार करा. त्यांना अशी नावं द्या: 01-Pre-Production, 02-Models, 03-Scenes, 04-Rendering. यातल्या पहिल्या म्हणजे ’01-Pre-Production’ या फोल्डरमध्ये तुम्ही स्क्रिप्ट किंवा स्टोरिबोर्ड सारख्या गोष्टी ठेवू शकता. मॉडेल्स तयार करताना आपल्याला दुसरं म्हणजे ’02-Models’ हे फोल्डर लागणार आहे. याच फोल्डरमध्ये आपण आपली सगळी मॉडेल्स ठेवणार आहोत.

      सुरवात एका सोप्या मॉडेल पासून करू. ते म्हणजे पुस्तकांचं कपाट. Book Rack.

CS3D-C03A1-Overview

      आपला संपूर्ण सेट असा दिसणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्यातलंच rackचं मॉडेल आपण आता तयार करायला घेऊ. तुमच्या माहितीसाठी मी इथे कपाटाची मोजमापं कशी असतील ते देतो.

 

CS3D-C03A2-Rack Dimensions

      या चित्रात कपाटाची एकंदर रचना कशी आहे ते दिसतंय. शिवाय त्याच्या प्रत्येक फळ्या कशा असतील आणि त्यांची मापं काय असतील तेही दिसतंय. या कपाटाची रुंदी 90cm आणि उंची 98cm आहे. प्रत्येक कप्प्याच्या उभ्या छोट्या फळ्या 30cm उंचीच्या आहेत आणि सगळ्यांची जाडी 2cm आहे. अर्थात तुम्हाला एकदम मापाप्रमाणे करण्याची गरज नाही, सुरवातीला आकार साधारण या चित्रासारखा आला तरी चालेल. मी दाखवताना बरोबर मापाप्रमाणे दाखवीन.

      आपण मागच्याच भागात बघितलं होतं की प्रत्येक मॉडेल हे आणखी काही पार्टसनी तयार झालेलं असतं. या कपाटाचंही असंच आहे. हे कपाट सुद्धा वेगवेगळ्या फळ्या जोडून तयार झालंय. याचं मॉडेल करताना आपण याची प्रत्येक फळी म्हणजे एक-एक ब्लेंडर मधला cube आहे असं समजू शकतो. आणि त्याचं dimension बदलून आपण त्यांना फळ्यांच्या मापाप्रमाणे बदलू शकतो. ही शिकायला एकदम सोपी पद्धत आहे. मग करायची सुरवात?

      सुरवातीला आपण कपाटाची सगळ्यात खालची फळी तयार करू. अर्थातच आधी एक cube घ्यायला लागेल. ब्लेंडर चालू केल्यावर एक cube viewport मध्ये असतोच. आपण त्याचा वापर करू शकतो. पण उजळणी म्हणून आपण नवीन cube कसा आणायचा ते बघू. मागे आपण बघितल्याप्रमाणे 3D Viewport च्या खालच्या पट्टीतून (footer मधून) cube आणू शकता. 3D View> add> cube. म्हणजे एक नवीन cube मिळेल. हेच काम करायला आणखी एक पद्धत आहे. तुम्ही viewport च्या डाव्या panel मध्ये बघितलंत तर तिथे एकदम डावीकडे तुम्हाला ‘Tools’, ‘Create’, असे काही सेक्शन दिसतील. त्यातल्या ‘Create’ सेक्शन मध्ये तुम्हाला थेट वेगवेगळ्या तयार ऑब्जेक्ट्स साठी बटन्स दिसतील. त्यातल्या Cube ला क्लिक केलीत तरीही एक cube तयार होईल.

      Cube तयार झाल्यावर आता आपण त्याची मोजमापं बघू. हा cube म्हणजे कपाटाची खालची फळी आहे, बरोबर? म्हणजे आपल्याला त्याची लांबी 90 सें. मी. लागेल. त्याची रुंदी 30 सें. मी. आणि जाडी 2 सें. मी. असेल. आपण आधी बघितल्याप्रमाणे cube ची मापं आपल्याला viewport च्या उजवीकडच्या panel मध्ये दिसतात. हा panel ‘N’ बटन दाबून उघडतो. त्यामुळे बऱ्याचवेळा याला ‘N-Panel असंच म्हंटलं जातं.

      या N-Panel मध्ये वरती ‘Transform’ च्या भागात तुम्हाला ‘Location, Rotation, Scale आणि Dimensions असे भाग दिसतील. त्यातल्या Dimensions मध्ये सध्या x, y, z पुढे तुम्हाला 2.000 असं दिसेल. याचा अर्थ हा cube 2 unit आकाराचा आहे. सध्या आपल्याला सेंटीमीटर किंवा फूट, इंच असं काही दिसत नाहीये. ते सगळं सेट करता येतं पण आपण ते पुढे कधीतरी बघू. ब्लेंडरचं स्वतःचं एकेक दिसत नसलं तरी ते मीटर असतं. त्यामुळे आपल्याला या क्यूबची मापं मीटरमध्ये भरता येतील.  90 सें. मी. म्हणजे 0.9 मी. किंवा 2 सें. मी. म्हणजे 0.02 मी. असं सें. मी. चं रुपांतर मीटरमध्ये करता येईल. आता ती अंतरं आपण ‘Dimensions’ मध्ये भरुया. त्यातल्या x, y, z च्या पुढे अनुक्रमे 0.9, 0.3 आणि 0.02 असं टाइप करा. म्हणजे तुम्हाला आपल्या मुळच्या cube चा आकार बदलून लांबट फळीसारखा झालेला दिसेल. नीट बघण्यासाठी तुम्ही viewport फिरवून किंवा जवळून बघू शकता. कसं बघायचं आठवतंय? माउसचं मधलं बटन दाबून माउस हलवलात तर तुम्हाला viewport फिरवून बघता येईल. म्हणजे तुम्ही फळीच्या चोहो-बाजूनी बघू शकाल. आणि माउसचं स्क्रोल-व्हील फिरवून लांबून किंवा जवळून बघू शकाल. बघा करून!

 

CS3D-C03A3-Rack-Modeling-Start

      ही झाली आपली पहिली फळी तयार. आहे की नाही सोप्पं. आता असंच आपण पुढच्या फळ्या तयार करू. आपल्या पहिल्या फळीचीच कॉपी करून आपण दुसरी फळी बनवू. त्यासाठी डाव्या panel मध्ये पुन्हा ‘टूल्स’ सेक्शन मध्ये जा. इथे ‘Edit’ मध्ये ‘Duplicate’ असं बटन दिसेल. ते दाबल्यावर सिलेक्ट असलेल्या पहिल्या क्यूबची डुप्लिकेट कॉपी तयार होईल. ‘Duplicate’ बटन दाबल्यावर माउस थोडा हलवलात तर दुसरा cube दिसेल. आपण याची डावीकडची उभी फळी बनवू. तीची उंची 98 सें. मी. म्हणजे 0.98 m आहे. आता ही दुसरी फळी सिलेक्टेड आहे, हे आपल्याला त्याच्या भोवती दिसणाऱ्या केशरी बॉर्डर वरून कळू शकतं. आता ‘N-Panel’ मध्ये याचे ‘Dimensions’ भरू. इथे x, y, z मध्ये 0.02, 0.3 आणि 0.98 भरा. म्हणजे उभी फळी तयार होईल. तीला हलवून आपण जागेवर बसवू शकतो. ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी Keyboard मधली ‘G-key’ दाबून माउस हलवा. आणि बरोबर वर मूव्ह करण्यासाठी ‘Z-key’ बटन दाबा. तसं बघितलं तर ब्लेंडर मध्ये खूप accurate काम करता येतं, पण सध्या आपण अंदाजे बसवू.

 

CS3D-C03B-Duplication

      पुढची म्हणजे खालून दुसरी आडवी फळी ही खालच्या फळीसारखीच आहे. म्हणून आपण तीलाच ‘डुप्लिकेट’ करू. त्यासाठी आधी खालच्या आडव्या फळीवर ‘Right-click’ करा. म्हणजे ती सिलेक्ट होईल. आता मगाचसारखं डावीकडच्या ‘Tools Panel’ मधून ‘Duplicate’ करा. आणि अंदाजेच थोडी वर हलवून ठेवा.

 

CS3D-C03C-Repeat-Dublicate

      आता उरलेल्या दोन्ही आडव्या फळ्या अशाच करून घेऊ. पुन्हा ‘Duplicate’ करून वर हलवून ठेवा. ही फळी लांबीला 60 सें. मी. म्हणजेच 0.6m आहे. म्हणून त्याच्या x Dimensions मध्ये 0.6 टाइप करा. म्हणजे मधली फळी बनेल. आता तीची आणखी एक Duplicate copy तयार करा. तिला वर उचलून तिच्या x Dimensions मध्ये 0.3 टाइप करा. ही झाली सगळ्यात वरची आडवी फळी.

 

CS3D-C03D-Duplicate-Scale

      आता आपण उरलेल्या उभ्या आणि छोट्या फळ्या तयार करू. त्यासाठी पहिल्या उभ्या फळीचा उपयोग होईल. त्यासाठी पहिल्या उभ्या फळीवर ‘Right-click’ करून तिला सिलेक्ट करा. आता तिची Duplicate करू. Duplicate बटन दाबल्यावर जर तुम्ही ‘X’ बटन दाबलंत तर कॉपी बरोबर आडवी हालेल. म्हणजेच X axis मध्ये हालेल. आता तिचं x dimension 0.9 च्या ऐवजी 0.3 करा. आता मी ब्लेंडरच्या बटणांची नावं नाही सांगणार. बघू तुम्हाला जमतंय का!

 

CS3D-C03E-Side-Plates

      आता उरलेल्या दोन उभ्या फळ्या तर एकदम सोप्या आहेत. मगाचच्या फळीच्या duplicate ला नुसतं वर आणि डावीकडे move करून ठेवलं की झालं.

 

CS3D-C03F-Side-Plate-Repeat

      झालं की आपलं पाहिलं मॉडेल तयार! मगाशी केलं तसं वेगवेगळ्या बाजूंनी फिरवून बघा. आणि एखादी फळी नीट बसली नसेल तर तिला हलवून जागेवर बसवून बघा. कसं कराल? आधी फळी सिलेक्ट करायची (विसरू नका – Right click) मग move करण्यासाठी ‘G-key’ दाबायची आणि माउस हलवायचा. आणि बरोबर वर खाली म्हणजेच Z axis मध्ये हलवण्यासाठी ‘G-key’ नंतर ”Z-key’ दाबायची. किंवा आडवं म्हणजे X axis साठी ‘X-key’ दाबायची. शेवटी move करून झालं की एंटर करायचं किंवा left-click करायची.

 

CS3D-C03G-Rack-View-Croped

      तर असं आपलं पहिलं 3D model तयार झालं. पण आता आपण सगळ्यात महत्वाचं काम करू. आपली फाईल सेव्ह करून ठेऊ. करायला पाहिजे ना? सेव्ह करण्यासाठी एकदम वरती असलेल्या ‘File’ मेनूमध्ये ‘Save’ ला click करा. एक मोठी स्क्रीन येईल. त्यात तुमच्या ‘Tingu’ फोल्डर मधलं ’02-Models’ फोल्डर सिलेक्ट करा. फाइलला ‘Rack-01’ असं नाव द्या आणि एंटर दाबा. ब्लेंडर च्या फाइल चं extension असतं .blend. म्हणजे त्या फोल्डर मध्ये ही फाइल ‘Rack-01.blend’ नावानी सेव्ह होईल.

      आपण आता बघितल्यापैकी एखादी पायरी तुम्हाला समजली नसेल तर मला नक्की सांगा. खाली ‘Reply’ सेक्शन मध्ये किंवा अद्वैत स्टुडिओजच्या facebook page वर निःसंकोच विचारा. मी नक्की उत्तर देईन आणि पुन्हा समजावून सांगीन. आधीचे म्हणजे volume 2 मधले 5, 6 आणि 7 हे भाग पुन्हा एकदा वाचा. एकदा तुम्हाला ब्लेंडर मधली ठराविक टुल्स माहित झाली की हळूहळू पुढचं शिकायला सोप्पं जाईल. आणि पुन्हा व्यवस्थित समजवायला मी आहेच की! तर मग पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत हे मॉडेल नक्की करून बघा आणि मला तुमचा अनुभव सांगा.

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.

7 comments

 1. Very nice & helpfool article for Blender3d learning.
  Can this article available in pdf format for offline reading.

 2. Hi,
  We need Duplicate tool multiple time in the above tutorial, So Is there any shortcut key for Duplicating Object….?

 3. Thanks ASHISH for you appreciation.

  The pdf format itself does not support the animated gif.

  But I will surely think of developing the articles in pdf format or will try to find some good solution for offline reading.

 4. Yes, Blender has many keyboard short-cuts to various tools and command like duplicate.

  The short-cut for the duplicate tool is ‘Shift+D’

 5. Thanks for the reply. Shortcut key for duplicate will help me lot in modelling book rack…!

Pingbacks

 1. C02- 3D modeling ओळख | Advaita Studios
 2. C04- Modelling- Chair | Advaita Studios