Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
01
Jul

C05- मॉडेलिंग उजळणी आणि काही नवीन शॉर्ट-कट्स

ब्लेंडर सारख्या 3D सॉफ्टवेअर्स-मध्ये मॉडेलिंग किंवा इतर कोणतंही काम करताना, 3D viewला वेगवेगळ्या बाजूंनी फिरवून बघणं खूप महत्वाचं असतं. समजा तुम्ही एखादं मॉडेल तयार करताय किंवा एखादं animation करताय, अशा वेळी मॉडेल फक्त एकाच बाजूनी बघितल्यामुळे आपल्या कामात अनेक चुका किंवा उणीवा राहू शकतात. अगदी साधं चित्रं काढतानाही कागद उलट करून बघितला की त्याच चित्रातल्या बऱ्याच चुका आपल्या सहज लक्षात येतात. त्यामुळे model वेगवेगळ्या बाजूनी बघणं म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विचार केल्यासारखंच आहे. त्यामुळे काम करताना मधूनमधून 3D view फिरवून मॉडेल वेगवेगळ्या बाजूनी बघून पुढे जाण्याची सवय तुम्ही लावूनच घ्या. अशा अनेक नेहमी लागणाऱ्या गोष्टींसाठी की-बोर्ड आणि माउस वापरून झटपट काम करता येतं. यातली काही टूल्स आपण आत्तापर्यंत वापरली आहेतच. आजच्या भागात आपण पुन्हा एकदा या महत्वाच्या टूल्सची उजळणी करूया. शिवाय त्यानिमित्तानी काही नवीन टूल्सची ओळखही करूया. म्हणजे इथून पुढच्या भागात ब्लेंडर हाताळायला तुम्हाला सोप्पं जाईल.

मग आता, 3D view फिरवून कसा बघायचा तिथपासून बघू.
3D view फिरवण्याला ब्लेंडर मध्ये ‘orbit (ऑरबिट) करणे’ म्हणतात. Orbit म्हणजे एखाद्या अक्षाभोवती फिरणे. यासाठी आधी माउस 3D view च्या मध्ये ठेवा आणि माउसचं मधलं बटन दाबून माउस हलवा. म्हणजेच middle click दाबून drag करा. हाच शॉर्टकट आपण असा लिहू शकतो:
3D view orbit: middle click drag
पुढचे शॉर्टकट मी असेच लिहून दाखवीन.

अशाचप्रकारे view ला जवळ किंवा लांब घेण्याला ‘zoom (झूम) करणे’ म्हणतात. हा शब्द तुम्ही camera वापरताना ऐकला असेल. Zoom करण्यासाठी माउसचं स्क्रोल व्हील फिरवून बघा. तुम्हाला ऑब्जेक्ट जवळ किंवा लांब दिसेल.
3D view zoom: scroll wheel.

आणि viewला डावीकडे/ उजवीकडे किंवा वर/ खाली ढकलण्याला 3D च्या भाषेत Pan (पॅन) म्हणतात. Pan करण्यासाठी एकावेळी की-बोर्ड आणि माउस दोन्ही वापरावी लागतात. की-बोर्ड वरचं ‘Shift’ बटन दाबून ठेवा आणि एकीकडे माउसच मधलं बटन दाबून माउस हलवा.
3D view pan: Shift + middle click drag

खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे तुम्हाला orbit, zoom आणि pan करता येईल.

CS3D-C05A-Orbit-Zoom-Pan

मॉडेलवर काम करताना viewport मध्ये ‘Z-key’ दाबली तर ‘wire-frame’ (वायर-फ्रेम) view चालू होतो. म्हणजेच आपल्याला मॉडेलमधून आरपार दिसून मॉडेलचा सांगाडा म्हणजे edges दिसायला लागतात. ‘Z-key’ पुन्हा दाबली तर आधीप्रमाणे ‘solid’ शेडींग सकट view दिसतो.

CS3D-C05K-Wireframe

view ला फिरवून बघताना बरोबर वरून किंवा समोरून बघण्यासाठी सुद्धा ब्लेंडरमध्ये काही शॉर्ट-कट्स आहेत. त्यासाठी की-बोर्ड वरच्या उजव्या भागात असणाऱ्या नंबर-पॅड चा फार छान वापर करता येतो.

<img class="aligncenter size-full wp-image-2390" src="http://advaita-studios.com/wp-content/uploads/2015/07/CS3D-C05L-numpad.jpg" alt="CS3D-C05L-numpad" width="511" height="389" srcset="http://advaita-studios.com/wp-content/uploads/2015/07/CS3D-C05L-numpad.jpg 511w, http://advaita-studios.com/wp-content/uploads/2015/07/CS3D-C05L-numpad-300×228 project management team.jpg 300w” sizes=”(max-width: 511px) 100vw, 511px” />

या ‘numpad’ मधल्या 1, 3 आणि 7 या key अनुक्रमे front, right आणि top view साठी वापरता येतात. हे लक्षात ठेवायलाही खूप सोप्पं आहे. 7 ही key वर आहे म्हणून ती Top view साठी, 3 ही उजव्या बाजूला आहे म्हणून ती Right view साठी आणि 1 ही Front view साठी, वापरली आहे.  शिवाय control key दाबून तिच्या बरोबरीनी याच 1, 3, 7 keys वापरल्या तर बरोबर उलट view मिळतो. Top साठी 7 key आहे, म्हणून त्याच्या उलट view साठी म्हणजे bottom view साठी control + 7 दाबता येतं.
Top view: 7
Front view: 1
Right view: 3
Bottom view: Control + 7
Back view: Control + 1
Left view: Control + 3

CS3D-C05J-Views

आता पुढे जाऊ. Viewport मधला कोणताही object सिलेक्ट करण्यासाठी त्याच्यावर माउसनी ‘right-click’ करायची.
Select object: Right click (on object)

एकदा एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला की आपण तो हलवू शकतो, त्याला फिरवू शकतो किंवा लहान-मोठं करू शकतो. यालाच move, rotate आणि scale म्हणतात.
object हलवण्यासाठी, म्हणजे move किंवा grab करण्यासाठी, माउस viewport मध्ये ठेवायचा आणि की-बोर्ड वरचं ‘G’ बटन दाबून माउस हलवायचा, की ऑब्जेक्टही त्या दिशेला हलतो.
Object move: G

CS3D-C05B-Move

असंच object ला फिरवण्यासाठी ‘R’ बटन वापरायचं आणि माउस हलवायचा.
Object rotate: R

CS3D-C05C-Rotate

आणि लहान मोठा करण्यासाठी ‘S’
Object scale: S

CS3D-C05D-Scale

move करताना object फक्त x, y किंवा z axis मधेच हलवा असं हवं असेल तर G नंतर आपण X, Y किंवा Z की दाबू शकतो. त्यामुळे object ची हालचाल त्या-त्या अक्षातच होते.
Object move: G X or G Y or G Z

CS3D-C05E-Move

अशाच प्रकारे rotate किंवा scale करतानाही आपण X, Y आणि Z axis वापरू शकतो. rotate साठी R-key नंतर किंवा scale करताना Z-key नंतर X, Y, Z पैकी हवातो axis निवडता येतो.

Object rotate: R X or R Y or R Z

CS3D-C05F-Rotate-with-Y

Object scale: S X or S Y or S Z

CS3D-C05G-Scale-Z

आता आपण objectच्या copy कशा तयार करायच्या ते बघू. यासाठी पहिल्यांदा ज्या object ची copy हवीये त्याला सिलेक्ट करायचं आणि नंतर shift + D-key दाबायची. यामुळे object ची डूप्लिकेट कॉपि तयार होते आणि लगेच मूव्ह मोड चालू होतो. नवीन तयार झालेला object तुम्ही हलवून बाजूला ठेऊ शकता. इथेही X, Y, Z पैकी axis निवडू शकता.
Object Duplicate: Shift + D

CS3D-C05H-Random Copy

आपण बघितलं की कोणताही object सिलेक्ट करण्यासाठी त्यावर right-click करावी लागते. दोन किंवा जास्त object एकदम सिलेक्ट करायचे असतील तर right-click करताना ‘Shift-key’ दाबून ठेवावी. त्यामुळे एकदम अनेक वस्तूंना हलवणे किंवा rotate करायला सोप्पं जातं. शिवाय एकदम सगळे objects सिलेक्ट करण्यासाठी आणि त्याच्या उलट म्हणजे एकही object सिलेक्टेड नसण्यासाठी ‘A-key’ दाबता येते. ती पुन्हा पुन्हा दाबल्यावर (म्हणजे Toggle) सगळे ऑब्जेक्ट select / deselect होतात.
Select more objects: Shift + Right click
Select all objects / Deselect all objects: A (toggle)

CS3D-C05I-Selection

आणखी गप्पा मारायला पुढच्या भागात नक्की भेटू…

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.