Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
15
Jul

C07- मॉडेलिंग- Flower pot

आता आपण मॉडेलिंग मधली थोडी पुढची पायरी चढू. आपण मागे बघितलं होतं की प्रत्येक ऑब्जेक्ट हा अनेक भागांपासून बनलेला असतो. जसा cube हा सहा चौकोनांपासून तयार होतो तसं. त्यातला प्रत्येक चौकोन सूद्धा चार बिंदूंचा आणि त्यांना जोडणाऱ्या चार कडांचा बनलेला असतो. या चौकोन, कडा आणि बिंदू अशा भागांना 3D software मध्ये polygon, edge आणि vertex म्हणतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा क्यूब 6 polygons, 12 edges आणि 8 vertices पासून बनलेला आहे. त्याचा आकार याच मुलभूत (elemental) भागांमुळे निश्चित होतो. प्रत्येक 3D ऑब्जेक्ट हा अशाच मुलभूत भागांचा बनलेला असतो. त्यामुळे त्यांना ‘elements of objects’ असंही म्हणतात.

Q: पण या ‘elements’ चा आपल्याला काय उपयोग होतो? आपण तर थेट तयार ‘क्यूब’ घेतो ना?

याचा खूपच उपयोग होतो. कारण क्यूब, स्फिअर असे काही आकार ब्लेंडरमध्ये तयार असले तरी ते फार थोडेच आहेत आणि ते खूपच प्राथमिक आहेत. आपल्याला बहुतेक वेळा त्याच्याहून क्लिष्ट आकार वापरावे लागतात. अशा वेळी लहान मुलांच्या ‘मेकॅनो’ सारखं या एलिमेण्ट्सचा वापर करून आपण संपूर्ण नवीन आकार बनवू शकतो. आणि त्याचीच एक झलक आज आपण घेणार आहोत. हे ‘elements’ आपल्याला ब्लेंडर मध्ये बघता येतात.

viewport च्या खाली असणाऱ्या पट्टीमध्ये म्हणजे फूटर मध्ये तुम्हाला एक ‘Object Mode’ असं बटन दिसेल. त्याच्यावर क्लिक करून त्याच्या आत ‘Edit mode’ सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला क्यूबचे एलिमेण्ट्स दिसायला लागतील. इथे तुम्ही या vertex सारख्या एलेमेण्ट्सना एडीट करू शकता म्हणून याला ‘Edit mode’ म्हणतात. आणि एडीट करून झालं की तुम्ही पुन्हा नेहमीच्या म्हणजे ”Object Mode’ ला जाऊ शकता.

CS3D-C07A-Edit-Mode

यालाच की-बोर्ड शॉर्टकट सुद्धा आहे. फुटर मधून बटन दाबण्याच्या ऐवजी viewport मध्ये माउस ठेऊन थेट ‘Tab’ key दाबली तरी एकाडएक ‘Edit mode’ आणि ‘Object Mode’ असा बदलता येतो.

CS3D-C07B-Edit-Mode-Shortcut

एडीट मोड चालू केला की आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या vertex दिसतात आणि त्यांच्यावर नेहमीप्रमाणे ‘Right-click’ केली की सेलेक्टही करता येतात.

एडीट मोड बटणाच्या थोडं पुढे तुम्हाला ‘Vertex, edges आणि polygons’ साठी तीन छोटी बटन्स दिसतील. त्यांच्यावर क्लिक करून आपण हव्या त्या एलिमेण्ट्स प्रमाणे सिलेक्ट करू शकतो.

CS3D-C07C-Vertex-Mode

 

CS3D-C07D-Edge-Mode

CS3D-C07E-Poly-Mode

शिवाय या ‘Vertex, edges आणि polygons’ साठीही एक शोर्ट कट आहे. एडीट मोड चालू असताना ‘Ctrl + Tab’ दाबल्यावर त्यांची एक छोटी लिस्ट दिसते. त्यात क्लिक करून आपण हवा तो एलिमेण्ट मोड चालू करू शकतो.

CS3D-C07F-Mode-Shortcut

आणि मग vertex, edges इत्यादींना हलवून किंवा एडीट करून कोणतेही वेगवेगळे आकार तयार करू शकतो. खरं म्हणजे यालाच 3D modeling म्हणतात. पण हे सगळं खूप टेक्निकल होतंय. आपण असं करू, आपण थेट काहीतरी बनवून बघू. म्हणजे तुम्हाला याचा नक्की उपयोग लक्षात येईल.

हा जो नेहमीचा क्यूब आहे तोच आपण एडीट करून बघू. तो सिलेक्टेड असताना ‘Tab’ दाबा. म्हणजे त्याचा एडीट मोड चालू होईल. आता polygon मोड चालू करून त्याच्या वरचा polygon सिलेक्ट करा. आता ‘E’ दाबून माउस हलवलात तर तुम्हाला त्याच्या वरती polygon तयार झालेले दिसतील. डावीकडच्या ‘Tool panel’ मध्ये यालाच ‘Extrude’ नावानी बटन दिसेल. अशा वेगवेगळ्या polygons ना तुम्ही Extrude करून बघा.

CS3D-C07G-Extude

आता आपण अशाच पद्धतीनी एक flower pot तयार करू. म्हणजे तुम्हाला या एडीट मोड चा उपयोग एकदम लक्षात येईल.

आधी नेहमीचा क्यूब डिलीट करून एक नवीन Cylinder घ्या.

CS3D-C07H-Add-Cylenderत्याच्या एडीट मोड मध्ये Polygon सिलेक्शन चालू करा. त्याचा वरच्या polygon सिलेक्ट करून तो एकदम खाली move करा.

Q: इथे ‘G Z’ असा की बोर्ड शॉर्टकट वापरता येतो?

नक्कीच! ब्लेण्डर मध्ये असे शॉर्टकट साधारण सगळीकडे एकसारखे वापरता येतात.

CS3d-C07I-Polygon-Move

जसं आपण या polygon ला move करू शकतो तसं scale सुद्धा करू शकतो. आता खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे ‘S’ आणि ‘E’ म्हणजे scale आणि Extrude असं एकाड-एक वापरून नवीन आकार तयार करून बघा.

CS3D-C07J-Extude

शेवटी सगळ्यात वर असलेला polygon डिलीट करा. (त्यासाठी X दाबून पुढे Face सिलेक्ट करा, म्हणजे polygon डिलीट होईल). आता तुम्हाला मस्त flower pot सारखा आकार तयार झालेला दिसेल.

अशा प्रकारे वेगवेगळे आकार किंवा मॉडेल्स करण्यासाठीच हा एडीट मोड असतो. खरं म्हणजे याच्यात अजून खूप टूल्स आहेत पण सध्या आपण या छोट्याशा flower pot पुरताच विचार करू.

खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे एडीट मोड मधून बाहेर येउन डावीकडच्या ‘Tools panel’ मधला ‘Smooth’ हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामुळे pot वरच्या polygon मध्ये एकसंधपणा आल्यासारखं भासेल. म्हणजेच polygon पासून बनलेला हा सरफेस smooth दिसेल.

CS3D-C07K-Smooth

Q:  मला वाटलंच नव्हतं की हे polygon, edge किंवा vertex इतके उपयोगी असतील.

मॉडेलिंग मधली जवळपास सगळीच कामं या एडीट मोडच्या मार्फत होतात. आणि polygon वगैरे सारख्या एलिमेण्ट्स मुळे मॉडेल करण्यासाठी एक वेगळीच पद्धत बनते.

आता या पॉटच्या मॉडेल वर आपण शेवटचा हात फिरवू. मागच्या भागात आपण क्यूब ला ‘Bevel’ नावाचा modifier दिला होता. आताही आपण असेच काही आणखी modifier वापरून बघू.

या आपल्या मॉडेल च्या modifier panel मध्ये जाऊन list मधून दोन modifiers आपल्याला द्यायचे आहे. पहिला आहे ‘Solidify’. याच्यामुळे आपल्या पॉट ला थोडी जाडी (thickness) तयार होते आणि त्याला घनपणा येतो (solidity येते). दुसरा modifier आहे ‘Subdivision surface’. हा थोडा वेगळा modifier आहे. याच्यामुळे आपला पॉट खूप गुळगुळीत बनल्याचा भास होईल.  हा modifier प्रत्येक polygons ला विभागून त्याचे अनेक polygon तयार करतो. (subdivision करतो).

CS3D-C07L-Modifires

Q: वा, आता हा पॉट एकदम मस्त दिसतोय.

CS3D-C07M-Flower-Pot-View

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.