Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
29
Jul

C08- निवेदन

नमस्कार, मी महेश देशपांडे, या भागामार्फत आपल्याला एक निवेदन करत आहे. आपण ब्लेंडर मधल्या मॉडेलिंगची सुरवात केलेलीच आहे. पुढचे भाग हे Materials, Animation आणि Rendering अशा विषयांशी निगडीत असतील. या सर्व विषयांची गुंतागुंत पुष्कळ आहे. त्यामुळे हे पुढचे भाग व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आले तर ते फारच सोप्पे होतील, असं मला वाटतं.

या सर्व प्रक्रियेमध्ये आमच्या ‘अद्वैत स्टुडिओज’ मधील 3D Artists आणि Animators खूप प्रमाणात सहभागी आहेत. ऑफिसमधली रोजची सर्व कामं सांभाळून हे सगळे जण या ट्रेनिंग सिरीजसाठीसुद्धा मनापासून वेळ काढत आहेत. इथून पुढे मी तुम्हाला या सर्वांशी जोडणार आहे. आम्ही सगळे मिळून अनेक ट्रेनिंग व्हिडिओज आपल्यापुढे मांडू. आणि तुम्ही या सर्व कलाकारांशीही संपर्क साधू शकाल, त्यांना प्रश्न आणि शंका विचारू शकाल. आम्ही सगळे तुमच्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू.

हे सगळं करत असताना आम्हा सगळ्यांना तुमचा अभिप्राय घेणं खूप महत्वाचं वाटतं. आपल्याकडून येणारा प्रत्येक अभिप्राय आमचा उत्साह वाढवतो. त्यामुळे या भागामार्फत आम्ही आपल्याला विनंती करत आहोत, की तुम्ही आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. विशेषकरून खालील मुद्यांवर आपलं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा:

१. आत्ता पर्यंतच्या भागात आणि इथून पुढच्या भागात काही सुधारणा सुचवू शकता का?
२. व्हिडिओच्या माध्यमातून येणारे भाग आपल्याला सोयीचे असतील का? की तुम्हाला सध्याची लेखी पद्धत सोपी वाटतीये?
३. तुम्हाला घरी ब्लेंडरवर काम करताना काही अडचणी येतायत का?
४. आमच्याशी संपर्क साधताना किंवा प्रश्न मांडताना काही अडचणी आहेत का?

अशा प्रकारच्या आणखीही कोणत्या बाबतीत जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की ‘Reply’ करा.

वरचा चौथा मुद्दा तुम्हाला लागू आहे का?
आमच्याशी संपर्क करण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला खूप सोप्पे पर्याय आहेत. एक तर तुम्ही थेट आमच्या facebook page वर तुमचं मत मांडू शकता.

किंवा या कोणत्याही लेखाच्या खाली असणाऱ्या ‘Leave a Reply’ सेक्शन मध्ये तुमचं मत किंवा प्रश्न मांडू शकता. टाइप करताना भाषेची अडचण असेल तर ‘English akshara vaprun marathit vicharalat’ तरी चालेल की 🙂 नाही का?

त्यामुळे मी अशी विनंती करतो की तुम्ही तुमचं मत, अभिप्राय, शंका किंवा प्रश्न आम्हाला जरूर कळवा. त्यामुळे ही ट्रेनिंग सिरीज योग्य दिशेनी नेण्यासाठी आम्हाला मदत होईल. आणि पुढचे भाग आणखी मजेदार, उपयोगी आणि तुम्हाला 3D मधल्या करियरच्या दृष्टीनी आणखी महत्वाचे ठरतील. नमस्कार.

 

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.