Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
16
Sep

C15- सर्व मॉडेल्स- डाऊनलोड आणि वापर

टिंगू प्रोजेक्टचं आत्ता-पर्यंत आपलं जेवढं काम झालं आहे, त्याच्या सगळ्या फाइल्स, आता मी तुम्हाला देत आहे.
तुम्ही तुमच्या कंप्युटरवर त्या सगळ्या फाइल्स डाउनलोड करून वापरून बघा. तुम्ही स्वतः काम करताना एखादं मॉडेल नीट झालं नसेल किंवा काही गोष्टी जमत नसतील तरी तुम्ही थेट ही तयार मॉडेल्स घेऊन पुढे जाऊ शकता आणि पुढचं म्हणजे animation चं मुख्य काम सुरु करू शकता. ही सगळी मॉडेल्स मी एका झिप फोल्डर मधून तुम्हाला देत आहे.
पुढील लिंक वर क्लिक केल्यावर तुमच्या-कडे त्याचं डाउनलोड सुरु होईल. ते कसं करायचं आणि डाउनलोड झाल्यावर फाइल्स कशा वापरायच्या हे पुढच्या व्हिडिओत दाखवलं आहे.

Click to Download

एकदा हे फोल्डर तुम्ही डाउनलोड केलं की तुम्ही त्यातल्या फाइल्स बघू शकाल.
या मुख्य ‘टिंगू’ फोल्डर मध्ये ४ आणखी फोल्डर्स आहेत. आपण पूर्वीच ठरवल्याप्रमाणे यात तुम्हाला ’01-Pre-Production’, ’02-Models’, ’03-Scenes’ आणि ’04-Rendering’ अशी फोल्डर्स दिसतील. या पुढच्या व्हिडिओत या फोल्डरमध्ये कोणत्या फाइल्स आहेत ते दाखवलंय. ’02-Models’ मध्ये अर्थातच सगळी ३D मॉडेल्स आहेत.

यातली सगळी मॉडेल्स तुम्हाला ब्लेंडर मध्ये आणायला आणि वापरायला सोपी जावीत म्हणून त्याच्यात अगदी थोड्याशा सुधारणा आम्ही आधीच केलेल्या आहेत. आणि त्याचे ब्लेंडरच्या भाषेत ‘ग्रुप’ बनवले आहेत. सध्या पुरता असं समजा, की ‘ग्रुप’ म्हणजे ही मॉडेल्स तुमच्या ब्लेंडरमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी असलेली एक सोय आहे.

एखाद्या मॉडेलला ब्लेंडरच्या सिन मध्ये इम्पोर्ट करणे याला ब्लेंडर मध्ये ‘Append’ करणे असं म्हणतात. पुढच्या व्हिडिओ मध्ये ग्रूप वापरून वेगवेगळी मॉडेल्स कशी append करायची ते बघू. अपेण्ड केल्यावर तुम्ही त्या मॉडेल्सना हवं तिथे हलवून ठेऊ शकता.

आता अशीच आणखी काही मॉडेल्स कशी append करायची आणि नंतर ती हलवून जागेवर ठेवायची हे बघूया.

एकदा सगळी मॉडेल्स जागच्या जागेवर बसली की आपला फिल्मचा मुख्य सेट तयार होईल. तुम्हीसुद्धा अशी फाईल तयार करून बघा. ती फील सेव्ह करण्यासाठी ’03-Scenes’ हे फोल्डर वापरायचं मात्र विसरू नका.

आणि अर्थातच अशी तयार फाईल आधीच त्या डाउनलोड फोल्डर मध्ये तुम्हाला दिसेल. समजा तुम्हाला स्वतःची फाईल तयार करताना काही अडचण आली तर तुम्ही ही तयार फाईल वापरू शकता. आणि animation च्या तयारीला लागू शकता.
पुढच्या काही भागात आपण या सेटचं लाइटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. आणि मुख्य म्हणजे थेट या सेटवर काही शॉटचं संपूर्ण animation कसं करता येईल ते बघणार आहोत. तेंव्हा पुन्हा नक्की भेटू…

 

< Back

Index

Next >

 

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.