Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
30
Sep

C17- एका शॉटचं कॅमेरा अॅनिमेशन

एका संपूर्ण शॉटचं कॅमेरा अॅनिमेशन कसं करायचं ते आपण या भागात बघूया. अर्थातच आपण सुरवातीला एक सोपा आणि छोटा शॉट निवडू.

तुम्हाला आठवत असेल की आपल्या फिल्मच्या गोष्टीमध्ये सुरवातीला, कॅमेरा बाहेरून खोलीत येतो, असा एक शॉट आहे. या शॉटप्रमाणे, सुरवातीला फिल्मचं नाव आणि चंद्र दिसतात नंतर कॅमेरा खोलीत येतो आणि खोलीतल्या सगळ्या वस्तू आपल्याला दिसतात. हा तसा एकदम सोपा शॉट आहे. त्यामुळे आपण हाच शॉट आपल्या अॅनिमेशन साठी निवडू. मागे मी दिलेल्या फाइल्समध्ये तुम्हाला आपल्या ‘टिंगू’ शॉर्ट-फिल्मची script आणि storyboards मिळतील. तुम्ही हवं तर एकदा त्यात बघून आणि वाचून घ्या म्हणजे आपल्याला या शॉटमध्ये नेमकं काय दाखवायचंय ते लक्षात येईल try these out.

आपण सध्यापुरता सुरवातीचं नाव, चंद्र किंवा आकाश अशा गोष्टींचा विचार करायला नको. या गोष्टी आपण नंतर बघू शकतो. सध्यापुरता आपण फक्त कॅमेरा कसा animate करता येईल ते बघू. या शॉटप्रमाणे सुरवातीला कॅमेरा खोली बाहेर असेल आणि काही वेळात तो खोलीच्या आत येईल. सध्या आपण हा वेळ 5 सेकंद म्हणजेच 120 फ्रेम्स इतका ठेऊ. कारण आपल्या फाईलमधल्या सध्याच्या सेटिंगप्रमाणे आपण प्रत्येक सेकंदासाठी 24 फ्रेम्स सेट केलेल्या आहेत. थोडक्यात पहिल्या आणि 120 व्या, या दोन फ्रेम्सवर ‘animation key’ असतील. एक खोलीच्या बाहेर असतानाची आणि दुसरी आत असतानाची. या प्रत्येक वेळी आपण कॅमेऱ्याला move आणि rotate करणार त्यामुळे या प्रत्येक फ्रेम्सवर position आणि rotation अशा दोन्हीसाठी key असतील.

कॅमेरा अॅनिमेशन करून झाल्यावर आपण ते तपासून बघू. हे करताना आपण थेट कॅमेरा-व्ह्यू मधून बघू शकतो किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या कोनातून बघू शकतो. जेणेकरून एकंदर अॅनिमेशन व्यवस्थित प्ले होतंय की नाही ते कळेल.

अॅनिमेशन-मध्ये जर काही चूका राहिल्या असतील, तर असं viewport मध्ये प्ले करून बघितल्यामुळे त्या दिसतात. पण बऱ्याच वेळेला viewport मध्ये प्ले करताना वेळेचा किंवा शॉटच्या टाइमिंगचा नीट अंदाज येत नाही. त्यासाठी रेंडरींग करून थेट व्हीडिओ बघणं हेच आवश्यक ठरतं. अशावेळी साध्या quality चं, झटपट होणारं रेंडरींग सुद्धा चालू शकतं. ब्लेंडरमध्ये यासाठी थेट viewport च्या रेकॉर्डिंगची सोय आहे. याला viewport capture असं म्हणतात. हे टूल कसं वापरायचं ते आपण बघू.

अशा प्रकारे तुम्हीही animation करून बघा. तुम्ही या शॉट शिवाय इतर शॉटचंही animation करता येतंय का ते बघा. पुढच्या भागात आपण टिंगूचं अॅनिमेशन असलेला एक शॉट बघू.

< Back

Index

Next >

 

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.