Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
07
Oct

C18- टिंगूच्या शॉटचं अॅनिमेशन

कॅमेरा अॅनिमेट करून झाल्यावर आता आपण टिंगूचं अॅनिमेशन असलेला एक शॉट घेऊ. यात प्रामुख्याने टिंगूची रीग वापरून अॅनिमेशन कसं करता येईल ते बघू.

यासाठी आपण आपल्या स्क्रिप्ट मधला ‘B31-Rapid-Pull’ हा शॉट घेऊ. या शॉटमध्ये रुबिक्स क्यूबचे रंग व्यवस्थित लावण्याचा जोरदार प्रयत्न टिंगू सुरु करतो.

आपण आधी या शॉटची स्क्रिप्ट आणि स्टोरीबोर्ड बघू.

अॅनिमेशन करण्यासाठी आपण ‘Scenes’ फोल्डर मधल्या ‘Master scene’ चा उपयोग करू. यात आपल्या सेटच्या दृष्टीनी सगळ्या गोष्टी आणि मॉडेल्स जागेवर लावलेली आहेत. पुढच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ‘Master scene’ ला ‘Save as’ करून तो खास या शॉटसाठी वापरू.

पुढच्या ३ व्हिडिओज् मध्ये अॅनिमेटरनी खरंखुरं अॅनिमेशन करतानाचं रेकॉर्डिंग आहे. ते बघून तुम्हाला प्रत्यक्ष अॅनिमेशन करताना अॅनिमेटर कशा प्रकारे काम करतो ते लक्षात येईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ pause करून पुन्हा-पुन्हा बघू शकाल.

अॅनिमेशन पूर्ण झाल्यावर ते नीट तपासून बघण्यासाठी आता त्याचं viewport capture करू. हे सुद्धा एक प्रकारचं रेंडरींग असल्यामुळे तुमच्या कंप्युटरच्या configuration नुसार तुमच्याकडे कमी-अधिक वेळ लागू शकेल.

अॅनिमेट करून त्याचं viewport capture झालेला शॉट आता आपण बघू. तुम्ही अॅनिमेट केलेला शॉट कदाचित थोडा वेगळा दिसेल. पण काही हरकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे टिंगूचं अॅनिमेशन नक्की करून बघा आणि वेगवेगळे प्रयोगसुद्धा करून बघा.

< Back

Index

Next >

 

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.