Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
21
Oct

C20- रेंडर सेटिंग्स

अॅनिमेशन झालेल्या सगळ्या शॉट्सचं मुख्य रेंडरींग कसं चालू करायचं हे आता आपण बघू. तसं रेंडरींग बद्दल आपण आधी बघितलंच आहे. आता त्याची उजळणी म्हणून आपल्या स्क्रिप्टमधल्या पहिल्या काही शॉटचं रेंडरींग बघू. पुढच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला हे रेंडरींग सेटिंग कसे केले जातात ते दिसेल.

एकदा मुख्य सेटिंग करून, एखाद्या फ्रेमची रेंडरींग टेस्ट करून झाली की संपूर्ण शॉटचं रेंडरींग सुरु करता येतं.

रेंडरींग झाल्यावर त्या शॉट्च्या रेंडर झाल्येल्या फ्रेम्स आपण सेट केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह होतात. अशा सगळ्या शॉटच्या सगळ्या फ्रेम्स एकदा रेंडर झाल्या की आपलं रेंडरींगचं मुख्य काम संपतं. पुढे एडिटिंग, साउण्ड मिक्सिंग इत्यादी पोस्ट-प्रोडक्शनची कामं करता येतात.

आणि असं एडिटिंग करून झाल्यावर आपला पहिला शॉट कसा दिसतो ते आता बघूया.

अर्थात पुढच्या वेळी आपण एडिटिंग अगदी सोप्या पद्धतीनी बघूया आणि मग तुम्हाला संपूर्ण तयार फिल्म बघायला मिळेल. तेंव्हा पुन्हा पुढच्या वेळी नक्की भेटू.

 

< Back

Index

Next >

 

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.