Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
28
Oct

C21- शॉर्ट फिल्मचं एडिटिंग

एकेका शॉटचं रेंडरींग कसं करायचं हे आपण मागच्या भागात बघितलं. प्रत्यक्ष रेंडरींग करायला बराच वेळ लागू शकतो. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर असं रेंडरींग नक्की करून बघितलं असेल. इकडे ‘अद्वैत स्टुडिओज’ मधल्या आमच्या टिम-नी संपूर्ण फिल्मचे सगळे शॉट रेंडर करून ठेवले आहेत. आता असे रेंडर झालेले शॉट एकत्र करून त्यांचं एडिटिंग कसं करायचं ते आपण बघू.

ब्लेंडरमध्ये असं एडिटिंग करण्यासाठी एक खास सेक्शन आहे. त्याला ‘video sequence editor’ म्हणतात. या सेक्शनमध्ये आपण सगळे रेंडर झालेले शॉट एकापुढे एक लाऊन त्याची एक सलग फिल्म तयार करू शकतो. म्हणूनच त्याला ‘sequencer’ म्हणतात. शिवाय अनेक बारीकसारीक बदल आणि सुधारणा करू शकतो. शेवटचा हात फिरवू शकतो. याशिवाय आवाज किंवा म्युझिक इत्यादी जोडू शकतो.

पुढच्या काही व्हिडिओज् मधे तुम्हाला हा sequencer कसा असतो आणि आपण त्याच्यात कसं काम करायचं ते दिसेल.

खरंतर एडिटिंग इत्यादी गोष्टी समजायला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही सुरवातीला animation वर जास्त लक्ष दिलं तरी चालेल. त्यामुळे या सगळ्या फिल्मचं एडिटिंग करून, त्यात वेगवेगळे आवाज इत्यादी जुळवून थेट तयार फिल्म आम्ही तुम्हाला देऊ. पण तुमच्या-पैकी कोणाला एडिटिंग इत्यादीची आवड असेल तर तुम्ही मला नक्की प्रश्न विचारू शकता. आणि एडिटिंगच काय तुम्ही इतरही बाबतीत तुमच्या अडचणी, शंका आम्हाला नक्की विचारा.

पुढचा भाग आपल्या सगळ्यांसाठी एकदम स्पेशल असणार आहे. कारण पुढच्या भागात आपण आपली तयार फिल्म बघणार आहोत. तर मग भेटूया पुढच्या भागात.

 

< Back

Index

Next >

 

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.