Facebook Twitter Google Plus LinkedIn YouTube
04
Nov

C22- The adventures of TINGU

नमस्कार, मला माहिती आहे की तुम्ही सगळे आजच्या भागाची खूप वाट बघत आहात. कारण आज सगळ्यांना आपली शॉर्ट-फिल्म बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुमचा आणखी वेळ न घेता मी थेट आपली फाइनल फिल्म इथे देत आहे. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की ही फिल्म बघताना शक्यतो ‘Full-screen’ करून बघा. (व्हिडिओच्या उजव्या खालच्या कोपऱ्यात त्याचं बटण आहे.)

तर सादर आहे,
आपल्या सगळ्यांची पहिली शॉर्ट-फिल्म
‘The adventures of TINGU’

काय आली ना मजा?
आपल्या इतक्या दिवसाच्या प्रयत्नाचं आणि अभ्यासाचं हे फळ आहे. मला इथे विशेष उल्लेख करावासा वाटतोय तो आपल्या ‘अद्वैत स्टुडिओज’ मधल्या सर्व कलाकारांचा आणि या प्रोजेक्ट वर काम केलेल्या सर्व स्टुडंट्सचा. त्यांच्या मेहनतीमुळे आणि सातत्यपूर्ण कामामुळे आज ही शॉर्ट-फिल्म प्रत्यक्षात येऊ शकली आहे. शिवाय मला तुम्हा सर्वांचेही खूप आभार मानायचे आहेत. कारण मागचे अनेक भाग आपण सातत्यानी आणि खूप आनंदानी वाचत आला आहात आणि मला प्रोत्साहन देत आला आहात.

आजचा भाग हा आपल्या ‘चला शिकूया 3D Animation’ सिरीजचा शेवटचा भाग आहे. बघता-बघता आपण अनेक गोष्टींबद्दल गप्पा मारल्या, computer graphics आणि 3D animation बद्दल आपण कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. मला असं वाटतं की आज मी फार मागोवा न घेता ते तुमच्यावरच सोपवत आहे. तुम्हीच थोडं मागे वळून पाहावं आणि आपण आतापर्यंत कसा प्रवास केला ते थोडं आठवावं, (visualise करावं) अशी माझी इच्छा आहे. माझ्यासाठी एवढं कराल ना?

ही सिरीज जरी इथे संपत असली, तरी आम्ही ‘अद्वैत स्टुडिओज’ मधले सर्व जण सहज तुमच्या आवाक्यात असू. या ब्लॉग आणि वेब-साइट च्या माध्यमातून तुम्ही केंव्हाही आमच्याशी संपर्क साधू शकता. शिवाय आम्हीही आणखी अनेक प्रकल्प सतत राबवत राहणार आहोत. तुमच्याकडून आलेल्या अनेक सूचना आणि प्रश्नावरून आम्ही अनेक प्रकारे सुधारणा करून पुढचे प्रकल्प आखत आहोत.

आपल्या या सिरीजचा मुख्य उद्देश होता की तुमच्या मनात 3D animation बद्दल नुसतं कुतूहल न रहाता, तुम्हाला त्याची अनेक बाजूनी माहिती व्हावी. तुम्ही या क्षेत्राकडे वळण्यापूर्वी डोळसपणे याकडे बघावं. आणि मला वाटतंय की एका अर्थी हे मूळ उद्दिष्ट सफल होत आहे. तुमच्याकडून मिळत राहणाऱ्या प्रतिक्रिया बघून आम्हाला खूप समाधान वाटतंय. तुमच्या पुढच्या संपूर्ण प्रवासाला आमच्या टीम कडून खूप शुभेच्छा.

हा भाग फक्त या सिरीजचा शेवट आहे,
पण ही पुढच्या मोठ्या वाटचालीची नवी सुरवात आहे!
नमस्कार.

पुन्हा नक्की भेटू,
आपला,
महेश देशपांडे

< Back

Index

Next >

Posted by Mahesh Deshpande

Director at Advaita Studios Pvt. Ltd. Having wide career experience in Design, 3d graphics and animation, since 1998. Actively involved in various 3d graphics programs and training.